no images were found
नांदायला येण्यास नकार दिल्याने पतीचा पत्नीवर ब्लेडहल्ला
परभणी : पत्नीने नांदायला येण्यास नकार दिल्यामुळे पतीने रागाच्या भरात पत्नीच्या गळ्यावर ब्लेडने वार करून जखमी केल्याची घटना परभणीच्या सेलू शहरातील अरब गल्ली इथे घडली आहे.
जालना जिल्ह्यातील अंबुडा येथील रमेश नामदेव चव्हाण हे आपल्या पत्नीला घेण्यासाठी सेलु शहरातील आरब गल्ली येथे आले होते. त्यांनी आपल्या पत्नीला नांदायला चल असे म्हणाले असता पत्नीने नांदायला येण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या रमेश चव्हाण यांनी खिशातून ब्लेड काढून आपल्या पत्नीच्या गळ्यावर वार केले. ब्लेडने वार केल्याने रमेश चव्हाण यांची पत्नी गंभीर जखमी झाल्याने तिला नातेवाईकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
या प्रकारणी रमेश चव्हाण यांची सासू लक्ष्मीबाई राठोड यांनी सेलू पोलीस ठाणे गाठून दिलेल्या तक्रारीवरून आरोपी जावयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड, पोलीस उपनिरीक्षक पुरी यांनी आरोपी जावई रमेश चव्हाण याला ताब्यात घेतले आहे.