Home बँकिंग एचडीएफसी बँक ग्रुप तर्फे एचडीएफसी टेक इन्नोव्हेटर्स २०२५ चे यशस्वी आयोजन

एचडीएफसी बँक ग्रुप तर्फे एचडीएफसी टेक इन्नोव्हेटर्स २०२५ चे यशस्वी आयोजन

30 second read
0
0
29

no images were found

एचडीएफसी बँक ग्रुप तर्फे एचडीएफसी टेक इन्नोव्हेटर्स २०२५ चे यशस्वी आयोजन

 मुंबई, : एचडीएफसी बँक ग्रुप तर्फे त्यांच्या एचडीएफसी टेक इन्नोव्हेटर्स २०२५ च्या चौथ्या पर्वाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.  यावेळी त्यांच्याकडून सहा क्षेत्रातील आणि उदयोन्मुख महिला संस्थापकांसाठीच्या दोन विशेष पुरस्कारांच्या माध्यमातून १० विजेत्यांची घोषणा करण्यात आली.  एचडीएफसी इन्नोव्हेटर्स २०२५ चे आयोजन हे एचडीएफसी बँक, एचडीएफसी कॅपिटल आणि एचडीएफसी एएमसी यांच्या सह ग्रुपच्या अन्य सहयोगी कंपन्या एचडीएफसी लाईफ, एचडीएफसी अर्गो, एचडीएफसी सिक्युरिटीज आणि एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील वाढत्या स्टार्ट अप इको सिस्टमला चालना देण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते.  या वर्षीच्या पर्वाला देशभरांतील २९० शहरांतून आलेल्या १६०० हून अधिक स्टार्टअप्स नी प्रतिसाद दिला होता.

      स्टार्टअप इकोसिस्टम ला चालना देण्यासाठी एचडीएफसी टेक इन्नोव्हेटर्सच्या माध्यमातून स्टार्टअप्सचा गौरव करण्यासाठी एक मंच उपलब्ध करुन दिला जातो आणि एचडीएफसी ग्रुप कंपन्यांना त्यांच्या बरोबर काम करुन एकत्रितपणे उत्पादने आणि उपायांची निर्मिती करणे शक्य होते.  या उपक्रमाच्या माध्यमातून उदयोन्मुख स्टार्ट अप्स ना ओळखून नाविन्यपूर्ण उपायांची निर्मिती करुन त्यांच्या व्यावसायिक प्रवासाला चालना मिळते. या वर्षीच्या सुरुवातीस एचडीएफसी बँके तर्फे क्यून्यू लॅब्स मध्ये गुंतवणूक केल्याची घोषणा करण्यात आली होती, त्यांच्याकडून प्रथमच एन्ड टू एन्ड क्वांटम सेफ सायबर सुरक्षा मंचाची निर्मिती केली गेली.  क्यू न्यू लॅब्स ची निवड ही एचडीएफसी टेक इन्नोव्हेटर्स २०२४ मध्ये करण्यात आली होती.  बँके तर्फे त्यांचा महत्त्वाचा सीएसआर प्रकल्प असलेल्या परिवर्तन अंतर्गत स्टार्टअप्सना सहकार्य केले जात असून हा ब्रॅन्ड देशभरांतील आघाडीच्या इन्क्युबेटर्स बरोबर कार्यरत असतो.

     एचडीएफसी बँकेच्या ब्रँच बँकिंग, पेमेंट्स, ट्रेझरी, लायबिलिटी प्रॉडक्ट्स, मार्केटिंग, व्हर्च्युअल चॅनल्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर चे ग्रुप हेड आशीष पार्थसारथी यांनी सांगितले “ आज इकडे उपस्थित राहून स्टार्ट अप्सची ओळख करतांना आणि त्यांच्या भारतातील पुढील पिढ्यांतील मोठ्या कंपन्या बनण्याच्या प्रवासाला हातभार लावतांना आंम्ही खूपच आनंदी आहोत. एक बँक म्हणून आम्ही नेहमीच इकोसिस्टम ला सर्वोत्कृष्ट उत्पादन सेवा देत असतो. आमच्या स्टार्टअप बिल्डअप प्रोग्राम उत्पादने ही खरोखर अनोखी असून अगदी कस्टमाईज्ड करंट अकाऊंट पासून ते किमान सात लोकांसाठी हेल्थ ग्रुप कव्हर पर्यंत, व्यावसायिक कार्ड्स आणि मुल्यावर्धित सेवा आणि नियामकांचे रिपोर्टिंग आणि एफडीआय तसेच ओडीआय व्यवहार फाईल करण्यापर्यंत आम्ही सहकार्य करत असतो.”

        एचडीएफसी एएमसी चे एमडी आणि सीईओ नवनीत मुनोत यांनी सांगितले “ नाविन्य हे आज मानवाच्या प्रत्येक स्तरावर महत्त्वपूर्ण आहे- अगदी अर्थपुरवठ्या पासून ते हेल्थकेअर ते डीप टेक, स्पेस टेक्नॉलॉजी आणि अगदी फ्रंटियर सायन्सेस पर्यंत.  एचडीएफसी बँक ग्रुप मध्ये आम्ही आंम्हाला भारताच्या नाविन्याच्या प्रवासातील एक दीर्घकालीन भागीदार समजतो आणि अशा लोकांना सहकार्य करतो जे त्यांच्या सीमारेषा ताणून शक्यतांमध्ये वाढ करतात.  एचडीएफसी एएमसी मध्ये आमचे हे उद्दिष्ट्य आहे की देशातील व्यावसायिक उर्जा ही प्रत्येक भारतीयाच्या मालमत्ता निर्मिती मध्ये दिसून येईल.  एचडीएफसी टेक इन्नोव्हेटर्स भारताला पुढे नेत असलेल्या शोधाला साजरे करत आहे. आंम्हाला अभिमान वाटतो की आम्ही देशाच्या भविष्याला आकार देण्यात आमचे योगदान देत आहोत.”

      एचडीएफसी कॅपिटल चे सीईओ विपुल रुंगटा यांनी सांगितले “ जगाच्या बदला मध्ये नाविन्य आणि तंत्रज्ञान हे दोन मोठे घटक असून मुल्य शृंखलेच्या प्रत्येक स्तरावर हा बदल दिसून येतो.  नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानावर आधारीत बदलां साठी आमची वचनबध्दता अधिक सक्षम होत असून त्यामुळे भविष्यासाठी तयार व्यावसायिक मॉडेल्ससाठी आम्ही तयार आहोत. इन्नोव्हेटर्स आणि क्षेत्रातील भागीदार यांच्या बरोबर एकत्र येऊन आम्ही सक्षम अशी प्रगती घडवून आणू आणि भारतातील सर्वोत्कृष्ट जग निर्माण करण्यासाठीच्या पुढील पिढी मध्ये आम्ही आमचे योगदान देऊ शकू.”

       गेल्या वर्षापर्यंत हा वार्षिक उपक्रम हा खालील क्षेत्रातील स्टार्ट अप्स वर लक्ष देऊन आयोजित करण्यात येत होता. जसे प्रॉपटेक, फिनटेक, सस्टेनेबिलिटी टेक, कन्झ्युमर टेक आणि न्यू एज टेक इत्यादी. या वर्षी या कार्यक्रमाचा स्तर वाढवून आणखी काही क्षेत्रे वाढवण्यात आली असून यामध्ये डिफेन्स ॲन्ड स्पेस टेक स्टार्ट अप्सचा समावेश करण्यात आला होता, त्याच बरोबर राष्ट्र निर्मितीच्या कार्यातील योगदाना बरोबरच महिला व्यावसायिकांसाठीही विशेष पुरस्कार देण्यात आले.

        यावेळी उपस्थित विविध वक्त्यांची भाषणे झाली यामध्ये एचडीएफसी कॅपिट आणि एचडीएफसी एएमसी चे चेअरमन श्री. दिपक पारेख, एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर श्री. शशीधर जगदिशन, एचडीएफसी बँकेच्या ब्रॅन्च बँकिंग, पेमेंट्स, ट्रेझरी, लायबिलिटी प्रॉडक्ट्स, मार्केटिंग, व्हर्च्युअल चॅनल्स आणि इन्फास्ट्रक्चर चे ग्रुप हेड, श्री. आशिष पार्थसारथी, एचडीएफसी कॅपिटल चे सीईओ विपुल रुंगटा, एचडीएफसी एएमसी चे एमडी आणि सीईओ श्री नवनीत मुनोत यांचा समावेश होता.

       या कार्यक्रमाचा शेवट हा ‘आर्किटेक्ट्स ऑफ इंडियाज स्टार्ट अप इकोसिस्टम’ या विषयावरील चर्चासत्राने झाला. या वेळी उपस्थित मान्यवरांमध्ये भारत सरकारच्या डीपीआयआयटी चे संयुक्त कार्यवाह श्री. संजीव, इन स्पेस चे डायरेक्ट- स्ट्रॅटेजी ॲन्ड प्लानिंग एअर व्हाईस मार्शल धनंजय व्ही खोत (निवृत्त), रेझरपे चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. शशांक कुमार, ए९१ पार्टनर्स चे जनरल पार्टनर श्री.गौतम मागो,  आयव्हीकॅप व्हेंचर्स चे मॅनेजिंग पार्टनर आणि संस्थापक श्री विक्रम गुप्ता आणि एचडीएफसी बँकेच्या सिनियर एक्झिक्युटिव्ह व्हाईस  प्रेसिडेंट श्रीमती सुनाली रोहरा यांचा समावेश होता.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In बँकिंग
Comments are closed.

Check Also

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक कोल्हापूर : …