no images were found
त्यांच्या पाकिटात काय काय आहे बरं? सोनी सबचे कलाकार सांगत आहेत आपल्या पाकिटात असलेल्या काही खास वस्तूंबद्दल!
आपल्या पाकिटात सामान्यतः दैनंदित आवश्यकतेच्या वस्तू असतात, पण काही लोकांच्या पाकिटात यापेक्षाही जास्त, वैयक्तिक आणि अर्थपूर्ण असे काहीतरी असते. एखादा धूसर झालेला फोटो, एखादी चिरखडलेली चिठ्ठी, भाग्य उजळणारी वस्तू किंवा स्मृतीचिन्ह – अशा वस्तू आपल्याला काही लोकांची, क्षणांची, मूल्यांची आठवण देतात. सोनी सबवरील कलाकार- रजत वर्मा, श्रेय मारडिया आणि गौरव चोप्रा सांगत आहेत, त्यांच्या पाकिटात विशेष असे काय असते! प्रेमाने दिलेल्या वस्तूपासून ते हस्ताक्षरातील काही मजकूर किंवा प्रेरणा देणारा संदेश असे काहीही असू शकते. या वस्तूंची सोबत तुम्हाला बऱ्याचदा काम करण्याची प्रेरणा देते. या प्रत्येकाच्या कहाणीतून प्रेक्षकांना पडद्यावर भावलेल्या व्यक्तिरेखेच्या मागे असलेल्या व्यक्तीचा स्वभाव दिसून येतो.
‘इत्ती सी खुशी’ मालिकेत विराट वर्माची भूमिका करणारा रजत वर्मा म्हणतो, “माझ्या पाकिटात नेहमी माझ्या आईचा फोटो असतो. लहानपणापासून माझ्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याच्या माझ्या प्रवासात तिने मला बळ दिले. तिचा फोटो मला हे स्मरण देतो की, मला स्वतःला स्वतःबद्दल शंका असताना देखील तिने माझ्यावर किती विश्वास दाखवला होता. माझे मित्र मला बऱ्याचदा ‘ममाज बॉय’ म्हणून चिडवतात, पण मला त्यात अभिमान वाटतो. माझ्यासाठी तो केवळ एक फोटो नाही, तर तिच्या निरपेक्ष प्रेमाचे आणि आपला प्रवास दृढतेने करण्यासाठी लागणाऱ्या धैर्याचे ते स्मृतीचिन्ह आहे.”
‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत ऋषभची भूमिका करणारा श्रेय मारडिया म्हणतो, “अनेक वर्षांपूर्वी माझ्या वडिलांसोबत केलेल्या एका बस प्रवासाचे तिकीट मी माझ्या पाकिटात जपून ठेवले आहे. ती खूप छोटीशी गोष्ट आहे, पण त्या प्रवासात आम्ही दोघांनी किती गप्पा मारल्या होत्या ह्याची ती आठवण आहे. जेव्हा जेव्हा ते तिकीट माझ्या नजरेस पडते, तेव्हा मला हे आठवते की मी कुठून आलो आहे आणि त्यांनी मला कोणती मूल्ये शिकवली आहेत. माझ्या प्रवासातील तो एक छोटासा भाग आहे, जो मला, मी कितीही दूरवर गेलो, तरी जमिनीशी बांधून ठेवतो.
‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत राजवीर शास्त्रीची भूमिका करणारा गौरव चोप्रा म्हणतो, “माझ्या पाकिटात मी कवितेच्या काही ओळी ठेवल्या आहेत, ज्या माझ्या वडिलांनी लिहिल्या आहेत. जेव्हा माझ्यासमोर एखादे आव्हान असते किंवा मोठा निर्णय घेण्याचा प्रसंग असतो, तेव्हा त्या ओळी मला स्पष्टता आणि बळ देतात. मी कुठेही गेलो, तरी त्या ओळींसोबत जणू माझ्या वडिलांचे प्रेम, सुजाणता आणि आठवणी माझ्या सोबत असतात.”