Home राजकीय यंत्रणा सक्षम ठेवा, मतदार याद्यांबाबत यापुढे निष्काळजीपणा नको : आमदार राजेश क्षीरसागर 

यंत्रणा सक्षम ठेवा, मतदार याद्यांबाबत यापुढे निष्काळजीपणा नको : आमदार राजेश क्षीरसागर 

2 second read
0
0
28

no images were found

यंत्रणा सक्षम ठेवा, मतदार याद्यांबाबत यापुढे निष्काळजीपणा नको : आमदार राजेश क्षीरसागर 

कोल्हापूर  : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात असून, प्रारुप मतदार याद्या जाहीर केल्या आहेत. मात्र, या मतदार याद्यांमध्ये अद्यापही घोळ आणि दुबार मतदारांची संख्या मोठी असल्याने गोंधळ झाला आहे. अंतिम मतदार यादीमध्ये चुका होवून कोणत्याही नागरिकावर, उमेदवारावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्या. प्रत्येकावर जबाबदारी निश्चित करून यंत्रणा सक्षम करा. यापुढे अंतिम मतदार याद्यांबाबत कोणताही निष्काळजीपणा करू नका, अशा सुचना गुरुवारी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केल्या. तसेच अंतिम मतदार यादीत चुक झाल्यास संबंधीत अधिकाऱ्यांसह, बिएलओंवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. गुरुवारी महापालिकेमध्ये मतदार मतदार यादी हरकतींचा आढावा आमदार राजेश क्षीरसागर यांनी घेतला.

प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी मतदार याद्यांमधील हरकतींच्या दुरुस्तींचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. मतदार याद्या दुरुस्त करण्याबाबत गांभियनि सुचना दिल्या आहेत. यादीमधील घोळ ही गंभीर बाब आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास, संबंधीतांवर जबाबदारी निश्चित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसुळ उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, प्रारुप मतदार यादी तयार करताना मोठ्या प्रमाणात चुका झाल्या आहेत. या तात्काळ दुरुस्त करणे गरजेचे आहे. मतदार याद्यांचे काम जलद गतीने करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करा. अधिकारी आणि बिएलओ यांचे प्रशिक्षण घ्या. प्रभागांशी संबधित अधिकारी आणि बीएलओ यांची यादी जाहीर करा. जेणेकरून नागरिकांना त्यांच्या तक्रारींबाबत संपर्क साधणे सहज शक्य होईल. दोन प्रभागांच्या बॉर्डरवरील नावांमध्ये मोठ्या प्रमाणत फेरबदल झाला आहे. हे जलदगतीने दुरुस्त करा. अंतिम मतदार यादी बिनचूक करावी अशा सुचना आमदार क्षीरसागर यांनी दिल्या. या यादीमध्ये चुका होवून कोणत्याही नागरिकावर, उमेदवारावर अन्याय झाल्यास संबंधीतांवर दंडात्मक कारवाई करावी असेही त्यांनी सांगितले.

प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी ही मतदार यादी जुलै २०२५ मधील आहे. यामध्ये दुरुस्ती करण्याचे काम सुरु आहे. पुर्वी एक प्रभाग रचना होती, आता चार प्रभाग एकत्र झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असुन, जुने बीएलओ निवृत्त झाले आहेत. यामुळे काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र वॉर्ड निहाय कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेवून त्यांचा संभ्रम दुर केला जात आहे. अंतिम मतदार यादी बिनचूक करण्यावरच प्रशासनाचा भर असल्याचे सांगितले.

अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसुळ १०० कंट्रोल चार्ट नवीन करण्यास सांगितले आहे. महापालिकेने स्वतः शहानिशा करण्याचे आदेश निवडणूक आँयोगाने दिले आहेत. यामुळे महापालिकेचे अधिकारी स्वतः जागेवर जाउन दुरुस्ती करत आहेत. तसेच बीएलओंची संख्याही वाढवण्यात आल्याचे सांगितले.

यावेळी शिवसेनेच्या उपस्थित पदाधिकाऱ्यानी, बीएलओंकडे १ हजार मतदारांची जबाबदारी आहे. मात्र यामध्येही त्यांच्याकडून चुका होत आहेत. दोन प्रभागांच्या -बॉर्डरवरच्या नावांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला आहे. हा घोळ दुरुस्त करणे गरजेचे आहे. तसेच बीएलओ नागरिकांना योग्य माहिती देत नाहीत, यामुळे नागरीकांच्यात संभ्रम निर्माण झाला असून तो दुर करावा.

अधिकारी, कर्मचारी यांच्या चुकांचे खापर शासन आणि प्रशासनावर नको : आमदार राजेश क्षीरसागर

प्रशासनाने मतदार यादीचे काम अत्यंत गांभीयनि करावे. यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीने होणार आहे. मतदार याद्यांमधील घोळाचे शासनावर आणि मनपा प्रशासनावर खापर फुटणार नाही, यामुळे न कोणत्याही उमेदवारावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी केल्या.

या बैठकीस आयुक्त कोल्हापूर महापालिका श्रीमती के मंजूलक्ष्मी, उपायुक्त शिल्पा दरेकर, अतिरिक्त आयुक्त महानगरपालिका रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, अभियंता गवळी, नगररचनाकार एन.एस.पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, समन्वयक कमलाकर जगदाळे, माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, तुकाराम साळोखे, उदय भोसले, अजय इंगवले, रमेश पुरेकर, अश्विन शेळके, दुर्गेश लिंग्रस, हर्षल सुर्वे, आश्पाक आजारेकर, गणेश रांगणेकर, नेपोलियन सोनुले, अरविंद मेढे, निलेश हंकारे, माजी नगरसेवक अभिजित चव्हाण, आदर्श जाधव, कृष्णा लोंढे आदी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पाणी पुरवठा विभागाच्यावतीने थकीत 27 कनेक्शन व 7 अनाधिकृत कनेक्शनवर कारवाई

पाणी पुरवठा विभागाच्यावतीने थकीत 27 कनेक्शन व 7 अनाधिकृत कनेक्शनवर कार…