Home शासकीय संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी

12 second read
0
0
31

no images were found

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी

कोल्हापूर (प्रतिनिधी): संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामांची आज प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी सकाळी पाहणी केली. पहिल्या टप्प्यातील उर्वरित कामे २० नोव्हेंबरपर्यंत, तर दुसऱ्या टप्प्यातील कामे १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सक्त सूचना संबंधित ठेकेदारांना दिल्या. तसेच तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असून तेही गतीने व नियोजित वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश दिले. नाट्यगृहाच्या दक्षिण बाजूची जागा ताब्यात आल्याने त्या जागेचा तात्काळ उपयोग करुन आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

         मागील बैठकीत ठरल्याप्रमाणे नाट्यगृहाच्या निविदा क्र. १ अंतर्गत येणारी कामे २० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावीत. उर्वरित कामांसाठी मनुष्यबळ वाढवून वेळेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासकांनी ठेकेदाराला दिले. निविदा क्र. ३ अंतर्गत ॲकॉस्टिक पॅनल, कुशन चेअर, स्टाईल व कारपेट यांचे नमुने प्रत्यक्ष स्थळी तयार करून त्यांची तपासणी झाल्यानंतरच अंतिम मान्यता घेऊन बसवण्याचे आदेशही देण्यात आले. नव्याने करण्यात येणाऱ्या प्रेक्षकांसाठीचे स्वच्छतागृह व अग्निशमन यंत्रणेसाठी भूमिगत पाण्याच्या टाकीचे आराखडे यांची पाहणी करुन सदरची कामे दर्जेदार करण्याच्या सूचना दिल्या.

         या पाहणी वेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता अनुराधा वांढरे, व्यवस्थापक समीर महाब्री तसेच संबंधित ठेकदार लक्ष्मी हेरिकॉनचे वेणु सुलगे, गोदरेज कंपनीचे महेश पांचाळ, इंजिनिअर्स ॲन्‍ड कॉन्ट्रक्टरचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ॲमेझॉन इंडियाची मोठी घोषणा: १२.५ कोटी उत्पादनांवर झिरो रेफरल फी, विक्रेत्यांना ७०% पर्यंत बचत

ॲमेझॉन इंडियाची मोठी घोषणा: १२.५ कोटी उत्पादनांवर झिरो रेफरल फी, विक्रेत्यांना ७०% पर्यंत …