Home मनोरंजन दिव्य बोध आणि भावा-भावातील भावबंध 

दिव्य बोध आणि भावा-भावातील भावबंध 

2 second read
0
0
39

no images were found

दिव्य बोध आणि भावा-भावातील भावबंध 

सोनी सबवरील ‘गाथा शिव परिवार की – गणेश कार्तिकेय’ ही पौराणिक मालिका आपल्या दिव्य कथानकाने प्रेक्षकांचे मन काबिज करत आहे. या मालिकेत भगवान शिव (मोहित मलिक), देवी पार्वती (श्रेनु परीख) आणि त्यांची मुलं गणेश (एकांश कथुरिया) आणि कार्तिकेय (सुभान खान) यांच्या फारशा न ऐकलेल्या कथा बघायला मिळत आहेत. या मालिकेत शिव परिवारातील नाते-संबंध, आव्हाने, विजय आणि मानवी भावनांची किनार असलेले त्यांचे दिव्यत्व प्रेक्षक अनुभवत आहेत.

आगामी भागांमध्ये, गणेश कार्तिकेयाला पुन्हा कैलासावर घेऊन येतो. येथे त्यांचा सामना हाहा (गुरु गोविंद), हूहू (सोहित सोनी) आणि तुंबरू (कुणाल सेठ) या तीन गंधर्वांशी होतो. या गंधर्वांकडे गणेश, शिव, पार्वती आणि ब्रह्माचे रूप दाखवणाऱ्या पाच मूर्ती असतात. ते कार्तिकेयाचा समावेश त्यात करत नाहीत, कारण ते त्याला देवता मानत नाहीत. ते त्याला केवळ सेनापती मानतात. हे पाहिल्यानंतर, गणेश हलकेच हस्तक्षेप करतो आणि मग शिव आणि ब्रह्मदेव त्या गंधर्वांना कार्तिकेयाच्या दिव्यतेचा बोध करून देतात. आपली चूक उमगल्यावर ते मनःपूर्वक माफी मागतात. दरम्यान, मूषक राज पराशर ऋषींच्या (मनोज कोल्हटकर) आश्रमात उच्छाद मांडतो. त्यामुळे पुन्हा गणेशाला मध्ये पडावे लागते. गणेश केवळ ज्ञानाची देवता असल्याचे मानून त्याचे दिव्यत्व न ओळखता तो गणेशाला बुद्धीच्या लढाईचे आव्हान देतो. पण अर्थात, गणेश प्रत्येक प्रश्नाचे अगदी सहजपणे उत्तर देतो. ते पाहून मूषक वरमतो. आपली चूक आणि गणेशाची सुजाणता ओळखून मूषक पश्चात्ताप करतो आणि गणेशाने आपल्याला त्याचे वाहन बनवावे अशी इच्छा व्यक्त करतो. या घटनाक्रमात, हे दोन्ही भाऊ गणेश आणि कार्तिकेय आपापल्या अनुभवातून घडत आहेत आणि एक देवता म्हणून पूर्णतेकडे वाटचाल करत आहेत.

‘गणेश कार्तिकेय’ मालिकेत गणेशाची भूमिका करणारा एकांश कथोरिया म्हणतो, “या कथानकात गणेशाच्या प्रवासातील एक खूप गोड आणि मजेदार भाग दिसतो. गणेश कोप न करता शांतपणे आपल्या बुद्धीचातुर्याचा उपयोग करून समस्या सोडवताना दिसतो. मूषक राज सोबतची दृश्ये करताना खूप मजा आली. त्यात खूप चातुर्य होते आणि खूप बोधही होता. गणेशाला कसा आपला उद्देश समजू लागला आहे, हे या कथानकांमधून दिसते. दयाळूपणा आणि ज्ञान यामुळे तुम्ही किती मोठे होऊ शकता हे देखील यातून समजते.”

‘गणेश कार्तिकेय’ मालिकेत कार्तिकेयाची भूमिका करणारा सुभान म्हणतो, “हा कथाभाग करताना खूपच मजा आली, कारण यातून दाखवले आहे की कार्तिकेय कसा मोठा होत आहे आणि देव होण्यासाठी कसे असले पाहिजे हे शिकतो आहे. सुरुवातीला लोकांना त्यांचे महत्त्व समजत नाही पण हळूहळू, तो खरा कोण आहे हे त्यांना समजते. या कथेत कार्तिकेय आणि गणेशातील जे नाते दाखवले आहे, ते खूप हृदयस्पर्शी आहे. भाऊ म्हणून ते एकमेकांना आधार देतात आणि पूरक ठरतात.”

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पाणी पुरवठा विभागाच्यावतीने थकीत 27 कनेक्शन व 7 अनाधिकृत कनेक्शनवर कारवाई

पाणी पुरवठा विभागाच्यावतीने थकीत 27 कनेक्शन व 7 अनाधिकृत कनेक्शनवर कार…