Home शासकीय शहरातील रस्त्यांच्या कामाची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी

शहरातील रस्त्यांच्या कामाची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी

18 second read
0
0
59

no images were found

शहरातील रस्त्यांच्या कामाची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ): शहरातील रस्त्यांच्या कामांची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज दुपारी अचानक पाहणी केली. यावेळी शासनाच्या व महापालिकेच्या निधीतून मंजूर कामे विहित मुदतीत न केलेने व पाहणी दरम्यान काही ठिकाणची कामे दर्जेदार नसल्याने शहर अभियंता रमेश मस्कर व उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर, निवास पोवार यांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

            प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी दुपारी अचानक टेंबलाई उड्डाणपूल ते टाकाळा, पी.एन.पाटील बंगला ते विजय बेकरी, सायबर चौक ते माऊली पुतळा चौक ते जगदाळे हॉल राजारामपूरी, गोखले कॉलेज चौक ते यल्लमा मंदीर ते हॉकी स्टेडियम ते संभाजीनगर, आयटीआय कॉलेज, कळंबा साई मंदिर, नविन वाशीनाका, क्रांतीसिंह नाना पाटीलनगर ते फुलेवाडी नाका ते जाऊळाचा गणपती मंदीर, गंगावेश ते महापालिका मुख्य इमारत, वायल्डर मेमोरियल चर्च ते आदित्य कॉर्नर या रस्त्यांची पाहणी केली. यावेळी शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर, निवास पोवार उपस्थित होते.

            यावेळी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी शासनाच्या व महापालिकेच्या स्वनिधीमधून मंजूर असलेली कामे तात्काळ गुणवत्तापुर्ण करण्याच्या सूचना शहर अभियंता यांना दिल्या. शहरातील रस्त्यांसाठी 2 कोटींचा निधी मंजूर केला असून विहित कालावधीत निधी मंजूर करुनही कामे पुर्ण केली नसल्याने हि कामे तातडीने सुरु करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. सदर ठिकाणी पुढील दोन आठवडयात पुन्हां फिरती करुन सर्व कामांची गुणवत्ता व रस्त्यांची तपासणी करणार असलेचे प्रशासकांनी सांगितले. यामध्ये दिरंगाई झाल्यास उपशहर अभियंता यांच्यावर सक्त कारवाई करणार असलेचे सांगितले. त्याचबरोबर एनकॅपमधून परिख पुलासाठी अडीच कोटी, फुलेवाडी रिंगरोडसाठी दिड कोटी मंजूर केले असलेने सदरची कामे मुदतीत पुर्ण करण्याच्या सूचना दिल्या. यापुर्वीही रिंगरोडसाठी निधी मंजूर करुन सदरची कामे पुर्ण करण्यात आली आहेत. त्याचबरोबर उर्वरीत रस्ते दुरुस्तीसाठी चारही विभागीय कार्यालयांना 2 कोटी निधी महानगरपालिका स्वनिधीमधून मंजूर करण्यात येणार आहे.

           या रस्त्यांच्या पाहणी दरम्यान प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी महापालिकेच्या निधीमधून 1 कोटी चारही विभागीय कार्यालयांना पहिल्या टप्प्यात पॅचवर्कच्या कामासाठी दिले होते. यामध्ये फक्त बेसवर्कची कामे पुर्ण करण्यात आली आहेत. सिल्कोट मारण्यात आले असल्याचे आढळून आले. यानंतर दुसऱ्या टप्यात आणखीन 1 कोटी मंजूर केली असूनही ती सुरु न केलेने व केलेल्या कामाचा दर्जा नसलेने प्रशासकांनी उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर, निवास पोवार यांना त्यांची वार्षीक वेतनवाढ का थोपवू नये, उपशहर अभियंता यांचा पदाचा अतिरिक्त कार्यभार का काढून घेऊ नये याबाबत कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आलेली आहे. त्याचबरोबर शहर अभियंता रमेश मस्कर यांनी प्रशासकांनी निधी मंजूर करुन देऊनही आपल्या नियंत्रणाखाली असलेल्या उपशहर अभियंता यांच्यावर नियंत्रण न ठेवलेबद्दल त्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आलेली आहे. ठेकेदार पृथ्वीराज पाटील यांनी मंजूर कामे विहित मुदतीत सुरु न केलेने त्यांलाही नोटीस बजाविण्यात आली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…