no images were found
कलाकारांनी नवरात्रीसाठी त्यांच्या आवडत्या खाद्यपदार्थांबाबत सांगितले!
सण म्हणजेच फक्त रोषणाई, संगीत व साजरीकरण नाही तर त्यामध्ये सेवन केले जाणारे खाद्यपदार्थ देखील तितकेच महत्त्वाचे आहेत, जे कुटुंबांना व मनांना एकत्र आणतात. पारंपारिक मिष्टान्नांपासून जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या घरगुती पाककलांपर्यंत एण्ड टीव्ही कलाकारांच्या आवडणाऱ्या खाद्यपदार्थांची यादी आहे, जी नवरात्रीला अधिक विशेष बनवते. हे कलाकार आहेत रोहिताश्व गौड (मनमोहन तिवारी, ‘भाबीजी घर पर है’), हिमानी शिवपुरी (कटोरी अम्मा, ‘हप्पू की उलटन पलटन’) आणि प्रियमवदा कांत (लतिका, ‘घरवाली पेडवाली’). या कलाकारांनी त्यांच्या उत्सवी आनंदामध्ये अधिक उत्साहाची भर करणाऱ्या स्वादांबाबत सांगितले. आगामी मालिका ‘घरवाली पेडवाली’मधील प्रियमवदा कांत ऊर्फ लतिका म्हणाल्या, ”मला उत्सवादरम्यान संतुलित, स्वादिष्ट, पोषक आणि मूड उत्साहित करणाऱ्या खाद्यपदार्थाचा आस्वाद घ्यायला आवडते. नवरात्रीदरम्यान मी दररोज उपवास करत नसले तरी मला साबुदाणा वडा आणि मखाना खीरचा आस्वाद घ्यायला खूप आवडते, त्यामधून खूप समाधान मिळते. माझ्या कुटुंबातील सदस्य नऊ दिवस उपवास करत असल्यामुळे मला या मिष्टान्नांचा आस्वाद घ्यायला मिळते (हसते). नवव्या दिवशी कन्या पूजनला आमची छोले भटुरे बनवण्याची परंपरा आहे आणि मी त्याचा मनसोक्त आस्वाद घेते. आम्ही एकत्र छोले भटुरे शिजवतो आणि माझ्या मते, आमच्यामधील नाते या खाद्यपदार्थाच्या स्वादाप्रमाणेच दृढ आहे. माझ्यासाठी या विशेष ट्रीटशिवाय सण अपूर्ण आहे, कारण ते भूकेचे शमन करण्यासोबत एकता व आनंदाचे क्षण तयार करतात.”
मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील हिमानी शिवपुरी ऊर्फ कटोरी अम्मा म्हणाल्या, ”सण मला खाद्यपदार्थ सेवन करण्याच्या जुन्या आठवणींमध्ये घेऊन जातात. नवरात्रीदरम्यान मी व्रत के आलू आणि सिंघाडा पिठाचा हलवा यांचे सेवन करते, दोन्हीही पौष्टिक व स्वादिष्ट आहेत. मी मोठे होत या पाककलांचा आस्वाद घेत आली आहे आणि आजही त्यांचे सेवन करते. मला त्यामधून खूप आनंद मिळतो. मी नवरात्रीदरम्यान उपवास करत असल्यामुळे या दिवसामध्ये ताजी फळे खाण्यासोबत दूध पिते. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी आम्ही पुरी, चना, हलवा व कढी-चावल तयार करतो. यांचे स्वाद मला त्वरित माझ्या मूळगावामधील जुन्या आठवणींमध्ये घेऊन जातात, जेथे हास्य, प्रार्थना आणि खाद्यपदार्थांनी सणाच्या खऱ्या जादूचा आनंद दिला होता.” मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील रोहिताश्व गौड ऊर्फ मनमोहन तिवारी म्हणाले, ”माझ्यासाठी घरगुती मिष्टान्नांचा आस्वाद घेतल्याशिवाय सण साजरीकरण अपूर्ण आहे. नवरात्रीदरम्यान मी साध्या सात्विक पदार्थांचा आस्वाद घेतो, ज्यामध्ये साबुदाणा खिचडी, कुट्टू के पकोडे आणि ताज्या फळांचा चाट यांचा समावेश असतो. ते मला बालपणीची आठवण करून देतात, तसेच आनंदाने उपवास करण्याचा उत्साह कायम ठेवतात. या सणाचा उत्साह वेगळाच आहे. मी पुरी, आलू सब्जी व हलवा यांचा आस्वाद घेतल्याशिवाय राहू शकत नाही, जे नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी आमच्या कुटुंबामध्ये बनवले जातात आणि ही आमची परंपराच आहे. ते माझ्या मुलींसह नऊ देवींसाठी बनवले जातात, ज्या घरी येऊन त्यांचा आस्वाद घेतात आणि आम्हाला आशीर्वाद देतात. हे खाद्यपदार्थ साधे असले तरी त्यांच्यामध्ये प्रेम व जुन्या आठवणी सामावलेल्या आहेत, ज्यामुळे सणादरम्यान खूप उत्साहपूर्ण वाटते.”