Home सामाजिक महायुती शासनाने शिक्षकांना वाढीव टप्पा दिल्याबद्दल खासदार धनंजय महाडिक यांचा शिक्षकांच्यावतीने झाला सत्कार

महायुती शासनाने शिक्षकांना वाढीव टप्पा दिल्याबद्दल खासदार धनंजय महाडिक यांचा शिक्षकांच्यावतीने झाला सत्कार

0 second read
0
0
148

no images were found

 

महायुती शासनाने शिक्षकांना वाढीव टप्पा दिल्याबद्दल खासदार धनंजय महाडिक यांचा शिक्षकांच्यावतीने झाला सत्कार

कोल्हापूर (प्रतिनिधी):महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली आज खासदार धनंजय महाडिक यांचा तुळशीचा हार घालून सत्कार करण्यात आला. विनाअनुदानित शाळा कृती समितीकडून, वाढीव टप्पा अनुदान मिळावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा चालू होता. या समितीने खासदार महाडिक यांची भेट घेवून, या प्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यानुसार खासदार धनंजय महाडिक यांनी शासन आणि शिक्षक यांच्यामध्ये मध्यस्थाची भूमिका निभावली. त्याला यश आले असून, महाराष्ट्रातील हजारो शिक्षकांना गणेशोत्सवापूर्वी, वाढीव टप्प्याचा शासन आदेश मिळाला. त्याबद्दल शिक्षक संघटनांच्यावतीने आज खासदार धनंजय महाडिक यांचा तुळशीचा भव्य हार अर्पण करून विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सुभाष खामकर, रंगराव तोरस्कर, केदारी मगदूम, सोलापूरचे मच्छिद्र सावंत, सोमनाथ पवार, अविनाश पाटील, सचिन चौगुले, शितल जाधव, सचिन आंबी, विनायक सपाटे, सावता माळी, भानुदास गाडे, जयदीप चव्हाण, भाग्यश्री राणे यांच्यासह शेकडो शिक्षक उपस्थित होते

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीचा दणदणीत विजय

ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीचा दणदणीत विज…