Home बँकिंग एचडीएफसी बँकेचा वार्षिक शॉपिंग बोनान्झा – फेस्टिव्ह ट्रीट्स 2025, 10,000 हून अधिक ऑफर्ससह सुरू

एचडीएफसी बँकेचा वार्षिक शॉपिंग बोनान्झा – फेस्टिव्ह ट्रीट्स 2025, 10,000 हून अधिक ऑफर्ससह सुरू

14 second read
0
0
39

no images were found

एचडीएफसी बँकेचा वार्षिक शॉपिंग बोनान्झा – फेस्टिव्ह ट्रीट्स 2025, 10,000 हून अधिक ऑफर्ससह सुरू

मुंबई, : भारतातील आघाडीची खासगी बँक एचडीएफसी बँकेने आपल्या वार्षिक फेस्टिव्ह ट्रीट्स 2025 मोहिमेची घोषणा केली आहे. या मोहिमेमुळे देशातील सणासुदीच्या खरेदीची सुरुवात झाली आहे. या देशभर लागू असलेल्या शॉपिंग बोनान्झामध्ये ग्राहकांना क्रेडिट कार्ड्स, लोन, पेझॅप (PayZapp) आणि इझीईएमआय (EASYEMI) वर 10,000 हून अधिक आकर्षक ऑफर्स मिळणार आहेत. त्यामुळे ग्राहकांसाठी सणासुदीची खरेदी अधिक परवडणारी आणि फायदेशीर ठरणार आहे.

बँकेकडून विविध उत्पादनांवर अनेक आकर्षक ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. यात एक्सप्रेस पर्सनल लोन, बिझनेस लोन, कार लोन, टू-व्हीलर लोन, होम लोन, गोल्ड लोन, कृषी लोन, कमर्शियल वाहनांसाठी लोन, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, बचत खाते, पेझॅप, सिक्युरिटीजवर लोन, प्रॉपर्टीवर लोन अशा अनेक सेवा समाविष्ट आहेत. एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्ड्स आणि कार्ड्सवरील इझीईएमआय वापरून खरेदी केल्यास ग्राहकांना सणासुदीच्या खरेदीवर 50,000 रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी मिळणार आहे. बँकेने अनेक आघाडीच्या ब्रॅण्ड्ससोबत भागीदारी केली आहे. जसे की, एलजीच्या उत्पादनांवर ग्राहकांना कार्ड्सवरील इझीईएमआय द्वारे 50,000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल, तसेच गुगल पिक्सेल – ज्याच्या खरेदीवर एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड्स आणि इझीईएमआय वापरून 10,000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. या फेस्टिव्ह ट्रीट्स ऑफर्स कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, हॉटेल/रेस्टॉरंट, ट्रॅव्हल, ज्वेलरी आणि इतर अनेक उत्पादनांवर लागू होणार आहेत. 

या वर्षीची फेस्टिव्ह ट्रीट्स मोहीम टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. ही मोहीम विविध सणांनुसार राबवली जाईल – सुरुवात ओणमपासून होईल, त्यानंतर गणेश चतुर्थी, नवरात्र, दुर्गापूजा आणि नंतर दिवाळी अशा प्रमुख सणांनुसार ऑफर्स दिल्या जातील. यामुळे ग्राहकांना त्यांच्या सणासुदीच्या काळात योग्य आणि आकर्षक ऑफर्स मिळतील.

एचडीएफसी बँक तिच्या मोठ्या नेटवर्कचा उपयोग या सणासुदीच्या मोहिमेसाठी करणार आहे – ज्यात 9,499 शाखा, 21,251 एटीएम आणि 6 लाखांहून अधिक व्यापारी आणि डीलर टचपॉइंट्स समाविष्ट आहेत. बँक 37,000 हून अधिक ठिकाणी विशेष उपक्रम राबवणार आहे – जसे की रिटेल सेंटर्स, रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स आणि ऑफिसेसमध्ये, जेणेकरून ग्राहकांपर्यंत या ऑफर्स सहज पोहोचू शकतील.

श्री. पराग राव, कंट्री हेड – पेमेंट्स, लायबिलिटी प्रोडक्ट्स, कन्स्युमर फायनान्स आणि मार्केटिंग, एचडीएफसी बँक म्हणाले, “देश सणाच्या उत्साहात रंगू लागला असताना, आम्ही आमच्या ग्राहकांसाठी अनेक आकर्षक ऑफर्स घेऊन आलो आहोत. या ऑफर्समुळे त्यांना खरेदी करताना बचतही करता येईल आणि उत्सवाचा आनंदही घेता येईल. हे सर्व आमच्या कार्ड्स, लोन, पेझॅप (PayZapp) आणि इझीईएमआय (EASYEMI) च्या ऑफर्स द्वारे शक्य होईल. फेस्टिव्ह ट्रीट्स ही आमची वार्षिक मोहीम असून ती देशातील खरेदीला चालना देते आणि ग्राहकांना त्यांच्या सणासुदीच्या खरेदीवर बचत करण्याची संधी उपलब्ध करून देते.”

श्री. रवी संथानम, ग्रुप हेड आणि सीएमओ, डायरेक्ट टू कंझ्युमर प्रॉडक्ट्सचे प्रमुख, एचडीएफसी बँक म्हणाले, फेस्टिव्ह ट्रीट्स ही आमची अनेक वर्षे चालणारी मोहीम आहे, जी सणासुदीच्या काळातील एक मोठी सुरुवात मानली जाते. आम्ही आमच्या मजबूत भौतिक आणि डिजिटल नेटवर्कद्वारे या खास ऑफर्स ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहोत. ओणमपासून दिवाळीपर्यंत टप्प्याटप्प्याने आणि स्थानिक पातळीवरील उपक्रमांद्वारे ही मोहीम राबवून आम्ही सुनिश्चित करू की या ऑफर्स केवळ आकर्षकच नव्हे तर स्थानिक समुदायांसाठीही अत्यंत उपयुक्त ठरतील.”

 
 
 
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In बँकिंग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण        &n…