no images were found
गौतम अदानी यांच्या 63व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
अहमदाबाद,: २४ जून रोजी अदानी समूहाचे चेअरमन श्री गौतम अदानी यांचा ६३वा वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने, अदानी ग्रुपची सामाजिक कल्याण आणि विकास शाखा असलेल्या अदानी फाउंडेशनने देशभरातील 21 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांतील 206 शहरांमध्ये भव्य रक्तदान मोहीम आयोजित केली. ही मोहीम मागील वर्षीच्या 25,282 युनिट्सच्या विक्रमावर मात करत विक्रमी ठरली आहे.
अदानी हेल्थकेअर टीमच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या या मोहिमेत अदानी समूहाचे कर्मचारी आणि भागीदार यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. या मोहिमेत 27,661 युनिट्स (सुमारे 11,100 लिटर) रक्त संकलित झाले असून, यामुळे 83,000 हून अधिक रुग्णांना लाभ होणार आहे. या संकलित रक्तामधून पूर्ण रक्त, पीसीव्ही, प्लेटलेट कॉन्सेंट्रेट्स, प्लाझ्मा, एफएफपी, क्रायोप्रेसिपिटेट आणि अल्ब्युमिन असे विविध रक्तघटक उपलब्ध करून देण्यात येणार आहेत , जे रुग्णांना जीवनदायी उपचारासाठी उपयुक्त ठरतील.
अदानी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्रीती अदानी म्हणाल्या, “या सेवाभावी उपक्रमात पुढे येऊन सहभाग नोंदविलेल्या आपल्या अदाणी परिवाराचे मी मनःपूर्वक आभार मानते. आपल्या उदारतेमुळे असंख्य जिवांचे आयुष्य उजळणार आहे.”
ही मोहीम रेड क्रॉस ब्लड बँक आणि शासकीय रुग्णालयांच्या सहकार्याने राबवली गेली. या मोहिमेला अदानी समूहातील 3,000 हून अधिक डॉक्टर, पॅरामेडिक्स, डेटा ऑपरेटर्स आणि प्रशासनिक कर्मचारी यांनी पाठिंबा दिला.
पहिल्यांदाच हा उपक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला, जिथे कोलंबो वेस्ट इंटरनॅशनल टर्मिनल (CWIT) पोर्ट, कोलंबो आणि दार-एस-सलाम पोर्ट, टांझानिया येथेही रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये 100 हून अधिक रक्तदात्यांनी या पुण्यकार्यामध्ये सहभाग घेतला.
हा उपक्रम 2011 सालापासून दरवर्षी श्री गौतम अदाणी यांच्या वाढदिवसानिमित्त एक परंपरा म्हणून राबवला जात आहे. “सेवा ही साधना आहे” या श्री आदाणी यांच्या मार्गदर्शक तत्त्वज्ञानाला अदानी फाउंडेशनच्या समाजाभिमुख उपक्रमांद्वारे आदरांजली अर्पण करण्यात येते. अदानी समूहाची ही सामाजिक संस्था समुदायांच्या सर्वसमावेशक, न्याय्य आणि शाश्वत विकासासाठी कटिबद्ध आहे.