no images were found
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक टप्पा15,500 मेगावॅट कार्यरत क्षमतेसह भारतातील आघाडीची नवीकरणीय ऊर्जा कंपनी
अहमदाबाद,: अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड (AGEL) ने नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करत 15,539.9 मेगावॅट कार्यरत क्षमतेचा टप्पा पार केला आहे. भारतातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी आणि वेगात वाढलेली नवीकरणीय ऊर्जा क्षमता असून, कंपनीने 15 महिन्यांत 5,000 मेगावॅट नव्याने जोडली आहे.
अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड ही भारतातील एकमेव कंपनी आहे जी पूर्णतः ग्रीनफिल्ड प्रकल्पांच्या माध्यमातून या टप्प्यावर पोहोचली आहे. कंपनीचे सध्याचे कार्यरत पोर्टफोलिओ सुमारे 11,005.5 मेगावॅट सौर, 1,977.8 मेगावॅट वारा, आणि 2,556.6 मेगावॅट सौर-वाऱ्याचे मिश्रित प्रकल्प असे आहे.
ठळक बाबी:
अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड चे प्रकल्प भारतातील युटिलिटी-स्केल सौर प्रकल्पांपैकी सुमारे 15% आणि सौर-वाऱ्याच्या एकत्रित क्षमतेपैकी 12% आहेत.
अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड आता जागतिक स्तरावर टॉप 10 स्वतंत्र नवीकरणीय ऊर्जा उत्पादकांमध्ये समाविष्ट झाली आहे.
FY25 मध्ये 3,309 मेगावॅट क्षमतेची भर – कोणत्याही भारतीय खेळाडूकडून एका वर्षात सर्वाधिक.
गुजरातमधील खावडा येथील जगातील सर्वात मोठ्या नवीकरणीय प्रकल्पात 5,355.9 मेगावॅट ची क्षमता आधीच कार्यरत.
श्री. आशिष खन्ना – मुख्य कार्यकारी अधिकारी, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड यांनी यशाबद्दल अभिमान व्यक्त करताना म्हणाले: “15,000 मेगावॅट चा टप्पा पार करणे हे आमच्या कार्यसंघाच्या समर्पणाचे आणि आमच्या प्रवर्तकांच्या दूरदृष्टीचे फळ आहे. श्री गौतम अदानी यांच्या ‘जगातील अग्रगण्य नवीकरणीय ऊर्जा उत्पादक होण्याच्या’ स्वप्नातून प्रेरित होत आम्ही 2030 पर्यंत 50,000 मेगावॅट क्षमतेचे उद्दिष्ट ठेवले आहे.”
7.9 दशलक्ष घरांना ऊर्जा, ईशान्य भारत संपूर्ण उजळणार अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड चे प्रकल्प सुमारे 7.9 दशलक्ष घरांना ऊर्जा पुरवठा करू शकतात. या क्षमतेच्या माध्यमातून कंपनी भारतातील 13 राज्यांत स्वच्छ ऊर्जा पोहोचवू शकते, तसेच संपूर्ण ईशान्य भारत वीजेत उजळवू शकतो.
खावडा प्रकल्प — पृथ्वीवरचा सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प गुजरातमधील खावडा येथे अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड 30,000 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प विकसित करत आहे. 538 चौ. किमी क्षेत्रफळ असलेला हा प्रकल्प पॅरिसपेक्षा पाचपट मोठा असून, अंतराळातूनही दिसू शकेल. आत्तापर्यंत 5,355.9 मेगावॅट ची क्षमता कार्यान्वित झाली आहे. ESG मध्ये अव्वल स्थानअदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड चे सर्व प्रकल्प वॉटर पॉझिटिव्ह प्रमाणित असून, NSE च्या ESG रेटिंगमध्ये कंपनीला भारतात व FTSE रसेल ESG स्कोअरमध्ये जागतिक स्तरावर पर्यायी वीज विभागात पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळाले आहे.