Home शासकीय विद्यार्थ्यांनी दीनदयाल स्पर्श योजनेचा लाभ घ्यावा

विद्यार्थ्यांनी दीनदयाल स्पर्श योजनेचा लाभ घ्यावा

15 second read
0
0
101

no images were found

विद्यार्थ्यांनी दीनदयाल स्पर्श योजनेचा लाभ घ्यावा

कोल्हापूर, : देशातील टपाल सेवा ही सामाजिक, आर्थिक जीवनाचा एक अभिन्न भाग आहे.  टपाल खात्याने नवनवीन योजना राबवून ग्राहक संख्या वाढवली असून विद्यार्थ्यांच्या छंदाला चालना देण्यासह त्यांना इतिहासाची माहिती करुन देण्यासाठी एक नवीन दीनदयाल स्पर्श योजना राबवण्यात येत आहे. ६ वी ते  ९ वी च्या शालेय विद्यार्थ्यांसाठी टपाल तिकिट संग्रह खाते योजना (फिलॅटेली डिपोझिट योजना) सुरु केली आहे. ई-मेल, व्हॉट्स ऍप फेसबुक व ट्विटरसारख्या सोशल मीडियाच्या काळातही विद्यार्थ्यांना पोस्टल स्टॅम्प अर्थात टपाल तिकिटे संग्रह करण्याचा छंद जडावा यासाठी टपाल खात्याने टपाल तिकिट संग्रह खाते योजना सुरु केली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी १ ऑगस्ट २०२५ पासून अर्ज स्वीकारण्यात येत असून अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख १० सप्टेंबर २०२५ असून या तारखेपर्यंत या कार्यालयास प्राप्त झालेले विद्यार्थ्यांचे अर्ज ग्राह्य धरण्यात येणार आहेत, अशी माहिती कोल्हापूरचे  प्रवर अधीक्षक डाकघर यांनी  प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

         फिलॅटेली एक छंद म्हणून जोपासण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला चालना देण्यासाठी अखिल भारतीय स्तरावर ९२० विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.  प्रत्येक सर्कलद्वारा जास्तीत जास्त ४० विद्यार्थ्यांना, ६ वी ते ९ वी च्या प्रत्येक इयतेतील प्रत्येकी १० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. शिष्यवृत्तीची रक्कम ५०० रुपये प्रतिमाह च्या दराने ६ हजार रुपये इतकी असेल. विद्यार्थी हा मान्यताप्राप्त शाळेचा विद्यार्थी असावा व त्याला नुकत्याच झालेल्या वार्षिक परीक्षेत कमीत कमी ६० टक्के गुण (अजा व अज यांना ५५ टक्के) असावेत. त्या शाळेचा फिलॅटेली क्लब असावा आणि तो विद्यार्थी त्या क्लब चा सदस्य असावा. जर शाळेचा फिलॅटेली क्लब नसेल तर त्या संबंधीत विद्यार्थ्यांचे स्वतंत्र टपाल तिकिट संग्रह खाते असावे. या योजनेत विद्यार्थ्यांची निवड ही फिलॅटेली प्रकल्प कार्यावरील मुल्यांकनावर किंवा सर्कल ऑफिस कडून आयोजित प्रश्न मंजुषा स्पर्धेतील कामगिरी वर केली जाईल. सर्कल स्तरावर स्थापन करण्यात आलेली एक समिती ज्यामध्ये टपाल पदाधिकारी आणि प्रसिद्ध फिलॅटेलिस्ट असतील ज्यांच्याकडून उमेदवाराने सादर केलेल्या प्रकल्पाच्या कामाचे मूल्यमापन केले जाईल.

      ज्या विषयावर प्रकल्प कार्य करायचे आहे त्या विषयाची सूची सर्कल ऑफिसद्वारा अधिसूचना जारी करतेवेळी जाहीर केली जाईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आपल्या पालकांसोबत पोस्ट ऑफिस बचत बँक किंवा इंडिया पोस्ट पेमेंट बैंक चे संयुक्त खाते उघडावे लागेल. प्रत्येक पोस्टल सर्कल पारितोषिकांची निवड करेल आणि लाभार्थ्यांना शिष्यवृती ची रक्कम देण्यासाठी POSB  IPPB ला सूचना देईल.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

आमदार अमल महाडिक यांचा हरित कोल्हा

आमदार अमल महाडिक यांचा हरित कोल्हापूरचा संकल्प; शहरात लावणार दहा हजार झाडे कोल्हापूर, (प्र…