Home स्पोर्ट्स जागतिक तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्‍या गाथा खडके, शर्वरी शेंडेला कांस्य

जागतिक तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्‍या गाथा खडके, शर्वरी शेंडेला कांस्य

29 second read
0
0
102

no images were found

 जागतिक तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्‍या गाथा खडके, शर्वरी शेंडेला कांस्य

पुणे ः कॅनडा  येथे सुरु असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या गाथा खडके, शर्वरी शेंडेने जियाना कुमारच्‍या साथीने ऐतिहासिक कांस्यपदकाचा कामगिरी केली आहे.

अमेरिकेच्या संघाचा ६-० ने दणदणीत विजय नोंदवून १८ वर्षांखालील रिकरर्व्ह प्रकारात भारतीय मुलींनी कांस्यपदकाचा पराक्रम केला आहे. पात्रता फेरीत भारत चौथ्या स्‍थानावर होता.  उपउपांत्‍यपूर्व फेरीत मेक्सिको संघावर ६-० ने सेटने पराभव करून स्‍पर्धेत विजयी सलामी दिली. उपांत्‍यपूर्व लढतीत बलाढ्य जपान संघाचा 5-3 सेटने पराभव भारताने उपांत्‍य फेरीत मुसंडी मारली होती.  उपांत्‍य फेरीत कोरिया संघाने भारताला कडवी झुंज दिली.  ६-२ सेटपर्यंत लढत रंगली. अखेर 1 गुण फरकाने कोरियाने निसटता विजय संपादन केला.

कांस्य पदकाच्‍या लढतीत अमेरिकेला भारताने एकाही विजयाची संधी दिली नाही. ५५-५३, ५९-५६,५५-५२ गुणांसह ६-० सेटने भारताने ऐतिहासिक कांस्य पदकाचर मोहर उमटवली. भारतीय संघांचे प्रशिक्षक प्रा रणजित चामले हे या संघांचे प्रशिक्षक होते. रणजीत सरांच्‍या प्रोत्‍साहनामुळे हे यश हाती आले असे सोलापूरच्‍या गाथा खडके हीने सांगितले. कांस्य पदक विजेता संघात सोलापूरच्‍या गाथा खडके, पुण्याच्‍या शर्वरी शेंडेसह चंदिगडच्‍या जियाना कुमार हीचा समावेश होता

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जलसंपदा विभागाकडून शेतकऱ्यांशी संबंधित सर्वच प्रक्रिया ऑनलाईन करणार- जलसंपदा मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील

जलसंपदा विभागाकडून शेतकऱ्यांशी संबंधित सर्वच प्रक्रिया ऑनलाईन करणार– जलसंपदा मंत्री …