Home शैक्षणिक आता वैद्यकीय शिक्षण मराठीतून, राज्य सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ शाखांचा समावेश

आता वैद्यकीय शिक्षण मराठीतून, राज्य सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ शाखांचा समावेश

0 second read
0
0
41

no images were found

आता वैद्यकीय शिक्षण मराठीतून, राज्य सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ शाखांचा समावेश

मुंबई : महाराष्ट्रातही मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याबाबतची मोठी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजान यांनी दिली आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मराठी भाषेत वैद्यकीय शिक्षण घेणं सोपं होणार आहे.
2023 या शैक्षणिक वर्षापासून ही सुविधा उपलब्ध असेल.एमबीबीएससह या शाखांचा अभ्यास मराठीतून उपलब्ध होणार आहे.
यामुळे आता एमबीबीएससह आयुर्वेद, होमिओपॅथी, दंतचिकित्सा, नर्सिंग, फिजिओथेरपी यांसारखे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मराठीतून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. 2023 च्या शैक्षणिक वर्षांपासून हे अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध होतील. विशेष म्हणजे मराठीतून वैद्यकीयचे शिक्षण घेणं बंधनकारक राहणार नाही, ते ऐच्छिक असेल.
मध्य प्रदेशनंतर आता महाराष्ट्रात राज्य भाषेत म्हणजेच मराठी भाषेत वैद्यकीय शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न असून सर्वच पॅथी, एमबीबीएस पर्यंतचा अभ्यासक्रम हा मराठीत देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं महाजन यांनी यावेळी सांगितलं आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा इंग्रजी बाबतचा न्यूनगंड दूर करावा यासाठी हा निर्णय घेतला. याबाबत समित्या नेमल्या असून पुढील शैक्षणिक वर्षांपासून हा निर्णय लागू करण्याता आमचा प्रयत्न आहे या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे, असंही महाजन म्हणाले आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…