no images were found
महापालिकेची विशेष पथकामार्फत रस्त्यावरी मोकाट 16 जनावरे पकडून गोशाळेत स्थलांतरीत
कोल्हापूर,(प्रतिनिधी ) : कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य कत्तलखाना विभागामार्फत शहरातील मोकाट व उनाड जनावरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. नागरीकांच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम उपआयुक्त परितोष कंकाळ यांच्या आदेशाने व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली आहे.
आरोग्य कत्तलखाना विभागामार्फत दि. 16 जुलै 2025 पासून सुरू झालेल्या या मोहिमेअंतर्गत शहरातील वर्दळीचे रस्ते, बाजारपेठा व भाजी मार्केट परिसरात मोकाट जनावरे पकडण्याचे काम करण्यात येत आहे. आतापर्यंत या पथकामार्फत 16 लहान-मोठी 6 पकडण्यात आली असून ती जनावरे शासनमान्य गोशाळा व पांजरपोळ संस्थांमध्ये हलवण्यात आली आहेत. याठिकाणी त्यांच्या संगोपनाची व चार्याची योग्य सोय करण्यात आली आहे. तसेच बुधवार, दि.30 जुलै 2025 रोजी राजारामपूरी 9 नंबर शाळेसमोरील परिसरात ही कारवाई करत असताना वैभव नाना पसारे यांनी महापालिकेच्या पथकाच्या कामात अडथळा आणला. याबाबत त्यांच्याविरोधात राजारामपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तरी संबंधीत नागरीकांनी आपल्या पाळीव जनावरांना रोडवरती मोकाट सोडू नये, अशा मोकाट जनावरे सोडणाऱ्यांवर महापालिकेच्यावतीने जनावरे जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल.