Home सामाजिक भारतीय जनसंघाचे संस्थापक, राष्ट्रनिष्ठ विचारवंत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने विनम्र अभिवादन

भारतीय जनसंघाचे संस्थापक, राष्ट्रनिष्ठ विचारवंत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने विनम्र अभिवादन

18 second read
0
0
39

no images were found

भारतीय जनसंघाचे संस्थापक, राष्ट्रनिष्ठ विचारवंत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने विनम्र अभिवादन

 

कोल्हापूर (प्रतिनिधी): भारतीय जनसंघाचे संस्थापक राष्ट्रनिष्ठ विचारवंत डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने करवीर नगर वाचन मंदिर या ठिकाणी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक,आमदार अमल महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल चिकोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आणीबाणी काळातील राजबंदी आणि सत्याग्रही यांना सन्मानित करण्यात आला. यामध्ये प्र द गणपूले प्रफुल्ल जोशी अशोक पाटील प्रमोद जोशी अशोक फडणीस अभय कुलकर्णी डॉक्टर मधु तोडकर विद्याधर काकडे अनु लिमये भगवान मिस्त्री आदींचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देण्यात आली.

      यानिमित्तानेच भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महानगरच्या वतीने सेवा, सुशासन व गरीब कल्याणाची 11 वर्षे पूर्तीच्या निमित्ताने गेल्या अकरा वर्षातील आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये जी विकासाची गंगा या भारत देशामध्ये आलेली आहे त्याची प्रदर्शनी करवीर नगर वाचन मंदिर येथे लावण्यात आलेली होती त्याचे उद्घाटनही वरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

      याप्रसंगी याप्रसंगी बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी माननीय मोदीजींच्या माध्यमातून उडान योजनेअंतर्गत विमानसेवा, कोल्हापूर मुंबई रेल्वेचे दुहेरीकरण करणे, कोल्हापूर महानगरपालिकेची सेवा असणाऱ्या केमटी साठी 100 इ बसेस मंजूर करणे अशा अनेक विषयांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याचा विकास चौफेर चालू आहे. गेल्या अकरा वर्षांमध्ये खऱ्या अर्थानं श्यामा प्रसाद मुखर्जींना अपेक्षित असणार पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अपेक्षित असणारे कार्य माननीय मोदीजींच्या माध्यमातून या देशांमध्ये घडत आहे.

     प्रदेश सचिव महेश जाधव म्हणाले, श्यामाप्रसाद मुखर्जींचे बलिदान वाया न जाऊ देता 370 कलम व 35 A अनुछेद रद्द करून माननीय पंतप्रधान मोदीजींनी खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली अर्पित केलेली आहे.

      जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले, सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून ज्या पद्धतीने माननीय मोदीजींचे काम चालू आहे त्यामुळे आज जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर असणारी भारताची अर्थव्यवस्था येणाऱ्या काळामध्ये प्रथम क्रमांकावरील असेल असा विश्वास आम्हा कार्यकर्त्यांना आहे.

याप्रसंगी हेमंत आराध्ये, राजसिंह शेळके, गणेश देसाई, माधुरी नकाते, गायत्री राऊत, कोमल देसाई, श्वेता गायकवाड, माधुरी कुलकर्णी, संतोष भिवते, संतोष माळी, अमर साठे, प्रज्ञेश हमलाई, विराज चिखलीकर, संपतराव पवार, आप्पा लाड, विजय सूर्यवंशी, अशोक लोहार, महादेव बिरंजे, मानसिंग पाटील, अतुल चव्हाण, विजय अग्रवाल सतीश आंबर्डेकर, दिलीप मैत्राणी यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोल्हापूरला राज्याच्या टॉप १० शहरांत स्थान मिळवून देवू : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूरला राज्याच्या टॉप १० शहरांत स्थान मिळवून देवू : आमदार राजेश क्षीरसागर कोल्हापूर(प…