no images were found
सांगत आहे अभिनेत्री नौशीन अली सरदार ‘वसुधा’मधील आपल्या परफॉर्मन्सबाबत!
झी टीव्हीवरील ‘वसुधा’ मालिका आपली भावनिक कथा आणि अनेक स्तर असलेल्या व्यक्तिरेखा यांसह देशभरातील प्रेक्षकांसोबत एक शक्तीशाली नाते निर्माण करत आहे. सध्या मालिकेतील घटनांना एक भावनिक वळण मिळाले असून, वसुधा (प्रिया ठाकूर) एका मोठ्या मानसिक धक्क्यातून जात आहे, कारण चौहान कुटुंब आता मेघा (मनदीप कौर) हिला देवांश (अभिषेक शर्मा) साठी योग्य जोडीदार मानू लागले आहेत. आगामी भागांमध्ये देवांश आणि मेघाच्या साखरपुड्याचा जल्लोष साजरा केला जाणार असून, पारंपरिकतेने भरलेले, संगीत आणि उत्साहाने भारलेले हे वातावरण भारावून टाकणारे असेल.
मात्र या थाटामाटात एक क्षण असा येतो जो खऱ्या अर्थाने शोस्टॉपर ठरतो—आकर्षक आणि मोहक घूमर सादरीकरण, जे चंद्रिकाच्या रूपात नौशीन अली सरदार यांनी साकारले आहे. राजस्थानच्या सांस्कृतिक परंपरेत खोल रुजलेला घूमर हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार आहे, जो नव्या सुरुवातींचे प्रतीक मानला जातो. नौशीन यांनी अत्यंत नाजूकतेने आणि प्रभावीपणे हे नृत्य सादर करत परंपरेला मान दिला आहे—बळकट गिरक्या, प्रभावी अशा हातांच्या हालचाली आणि मंचावरील त्यांच्या उपस्थितीने हे सादरीकरण उठून दिसले. या सीक्वेन्ससाठी त्यांनी चार दिवस कसून सराव केला. एका प्रोफेशनल कोरिओग्राफरच्या मार्गदर्शनाखाली पायांची हालचाल, हातांचे नाजूक इशारे आणि घूमरची खास शैली आत्मसात करत त्या साकारणे ही एक साधना होती.
स्वतःच्या अनुभवाबद्दल बोलताना नौशीन अली सरदार म्हणाल्या, “घूमर सादर करणे ही माझ्यासाठी खूपच आनंददायक आणि विशेष गोष्ट होती. हे नृत्य अत्यंत नाजूक, परंपराशील आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आहे. मी चार दिवस या नृत्याचा सखोल सराव केला—हातांचे इशारे, पावलांचा ठेका, आणि चेहऱ्यावरील भाव सर्व काही समजून घेतले. आम्ही पारंपरिकतेला न्याय देण्यासाठी प्रत्येक हालचाल बारकाईने शिकली. मी संपूर्ण पोशाखात सराव केला, ज्यामुळे घागऱ्याचं वजन, त्याचा फडफडणारा पट आणि गिरक्या घेताना लागणारा ठेका याची खरी अनुभूती मिळाली. मी चंद्रिकेचा नाजूकपणा जपत हे नृत्य प्रामाणिकपणे सादर करण्याचा प्रयत्न केला.”
त्या पुढे म्हणाल्या, “शूटच्या दिवशी मी 22 पूर्ण घूमर केले—तेही वेगवेगळ्या अँगल्ससाठी अनेक टेक्समध्ये! हा एक खूप दमवणारा अनुभव होता, पण त्याचा उत्साह आणि त्यामागील भावना यांनी मला पुढे जात राहण्यासाठी प्रेरणा दिली. केवळ नृत्यातूनच नव्हे तर माझ्या संपूर्ण उर्जेतून मी तो भाव प्रकट करायचा प्रयत्न केला. सेटवरील सर्व जण खूपच सहकार्य करत होते आणि त्यामुळे मी माझं सर्वोत्तम देऊ शकले.”
देवांश आणि मेघाच्या साखरपुडा समारंभात सध्या सगळ्यांचे लक्ष केंद्रित झाले असताना, एक मोठा प्रश्न उभा राहतो—मेघा खरंच चौहान कुटुंबाचं मन जिंकणार का? की वसुधा सत्य उघड करून त्यांच्या आयुष्याचा मार्गच बदलून टाकणार?