Home Uncategorized रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट शॉर्ट्सने राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या सहभागाने नवीन मोहीमेची सुरुवात केली जी आहे – ‘फॉर दि सिलेक्ट वन्स’

रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट शॉर्ट्सने राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या सहभागाने नवीन मोहीमेची सुरुवात केली जी आहे – ‘फॉर दि सिलेक्ट वन्स’

47 second read
0
0
48

no images were found

रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट शॉर्ट्सने राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या सहभागाने नवीन मोहीमेची सुरुवात केली जी आहे – ‘फॉर दि सिलेक्ट वन्स’

 

कला, चारित्र्य आणि निवडीला चालना देणारी ही मोहीम ‘दि सिलेक्ट वन्स’ – सामान्यपणा नाकारणारे, विवेकी निर्णय घेणारे आणि यशाचा मार्ग स्वतः तयार करणाऱ्या निवडक व्यक्तीमत्वांचा सन्मान करते.

 

मुंबई,: भारतातील सर्वोत्तम लघुपट कथाकथनासाठी समीक्षकांनी प्रशंसित केलेले व्यासपीठ, रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट शॉर्ट्सने त्यांची नवीन संकल्पनात्मक मोहीम, फॉर द सिलेक्ट वन्सचे, सादरीकरण केले, ज्यामध्ये प्रसिद्ध कलाकार राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचा सहभाग आहे. FCB NEOची संकल्पना असलेलीही मोहीम अशा लोकांना समर्पित आहे जे यशाच्या प्रवासात, सातत्याने विचारपूर्वक निवडकरत असतात – त्यांच्या मूल्यांशी आणि आकांक्षांशी प्रामाणिक राहून बदल आणि ज्ञानासाठी प्रयत्न करतात.

       ब्रँडच्या यशाच्या तत्वज्ञानावर आधारित, ही मोहीमेची फिल्म एक सांस्कृतिक आणि कलात्मक प्रदर्शन आहे – जे रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट शॉर्ट्सच्या मूळ, उद्देशपूर्ण आणि विशिष्ट कथांप्रती असलेल्या वचनबद्धतेला पुन्हा बढती देतो.

      येथे ब्रँड फिल्म बघा:For The Select Ones | Rajkummar Rao and Patralekha | Royal Stag Barrel Select Shorts – YouTube

        गेल्या काही वर्षांत, या प्लॅटफॉर्मने भारतातील प्रसिद्ध कलाकार आणि चित्रपट निर्माते – सुजॉय घोष, अनुराग कश्यप, नीरज घायवान, दिवाकर बॅनर्जी आणि तिग्मांशू धुलिया – यांच्याशी सहकार्य केले आहे. या प्रत्येकाने वेगळ्या, विचारप्रवर्तक कथा सादर केल्या आहेत ज्या एका बदलात्मक कलात्मक दृष्टिकोनातून मांडल्या गेल्या आहेत. राजकुमार राव आणि पत्रलेखा – दोघेही त्यांच्या निराळ्या निवडी आणि आकर्षक कामगिरीसाठी ओळखले जातात – यांना सोबत घेतल्याने, या मोहीमेमुळे ब्रँडचे प्रेक्षकांशी भावनिक नाते अधिक घट्ट होते. त्यांचा प्रवास म्हणजे ते का निवडल्या गेले हे सांगणारा एकप्रकारे सार आहे.

        पर्नोड रिकार्ड इंडियाचे मुख्य विपणन अधिकारी कार्तीक मोहिंद्रा म्हणाले: “रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट शॉर्ट्सने एक अशी व्यवस्था तयार केली आहे ज्यामुळे जिज्ञासू आणि विवेकी प्रेक्षकांपर्यंत जागतिक दर्जाच्या कथा पोहोचतात, आणि त्यामुळेच ते भारतामधील लघुपटांसाठीचे एक ठिकाण बनले आहे. आमच्या नवीन संकल्पनात्मकमोहिम, फॉर द सिलेक्ट वन्ससह, आम्ही आमच्या ब्रँडच्या निवडक कथाकथन प्रवासाचा हा पुढील भाग सुरू ठेवत आहोत, जो त्यांच्या निवडींच्या माध्यमातून यशाचे साजरीकरण करतो.”

      CCO, FCB NEOमयुरेश दुभाषी म्हणाले, “ही फिल्म चांगल्या प्रकारे निवड करण्याच्या कलेला समर्पित आहे. भरपूर पर्याय असलेल्या जगात, आपण काय नाकारतो आणि काय स्वीकारतो यावरून आपली खरी ओळख निर्माण होते. राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्यासोबत ही कथा तयार करण्याची प्रक्रियेमध्ये सूक्ष्म, अंतर्गत प्रवासाला टिपल्या गेले, जिथे प्रत्येक निवड म्हणजे अगदी प्रामाणिकपणे केलेली होती. ही प्रक्रिया रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट शॉर्ट्सच्या बदलत्या आणि निर्भय दृष्टीने व्यक्तींना सन्मानित करण्याच्या विचारांना जुळते.”

      आपले विचार व्यक्त करतांना, राजकुमार राव म्हणाले,: “खरे यश आपण प्रामाणिक राहण्यात आणि आपली ओळख सांगणारी निवड करण्यातच आहे हे मी गेल्या काही वर्षांत शिकलो. मी साकारत असलेल्या भूमिकांमध्ये असो किंवा आयुष्यात मी घेतलेले निर्णय असोत, मी नेहमीच वस्तुनिष्ठता आणि हेतू यांच्यात संतुलन राखण्याचे ध्येय ठेवले आहे. फॉर द सिलेक्ट वन्स ही त्याच विचारधारेशी जुळणारी मोहीम आहे – ज्यात प्रामाणिकपणा, विचारशीलता आणि व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापन समाविष्ट आहे. विचारपूर्वक केलेल्या निवडीचा सन्मान करणाऱ्या रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट शॉर्ट्सच्या मोहिमेचा मी एक भाग असल्याचा मला अभिमान आहे.”

      याप्रसंगी पत्रलेखा म्हणाली:”माझ्या संपूर्ण प्रवासात, मी नेहमीच माझा मार्ग स्वतःच तयार करण्यावर विश्वास ठेवला आहे. रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट शॉर्ट्सच्या लघुपटांचाआवाका,कला आणि कथाकथन याचे मी बऱ्याच कालावधीपासूनकौतुक करत होते. त्यांची कथा खऱ्या कलात्मक दृष्टीने कथा सांगितलेली असावी या माझ्या विश्वासाला जुळते.विचार आणि उत्कृष्टतेला प्रोत्साहन देणाऱ्या ब्रँडसोबत सहयोग करण्याचा मला अभिमान आहे.”

 ‘फॉर द सिलेक्ट वन्स’च्या केंद्रस्थानी असलेल्या विविधता आणि आकांक्षेचे प्रतिबिंब असलेली कायमस्वरूपी छाप सोडण्याच्या उद्देशाने उच्च-डेसिबल लाँचद्वारे ही मोहीम अधिक तीव्र केली जाईल.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सु…