Home मनोरंजन वीर हनुमान मालिकेत हुनर हाली गांधी झळकणार योद्धा, साम्राज्ञी कैकयीच्या भूमिकेत

वीर हनुमान मालिकेत हुनर हाली गांधी झळकणार योद्धा, साम्राज्ञी कैकयीच्या भूमिकेत

1 second read
0
0
52

no images were found

वीर हनुमान मालिकेत हुनर हाली गांधी झळकणार योद्धा, साम्राज्ञी कैकयीच्या भूमिकेत

सोनी सब वाहिनीवरील ‘वीर हनुमान’ मालिका हनुमानाच्या कमी ज्ञात असलेल्या गोष्टी सादर करून प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. यात काम करणाऱ्या मोठमोठ्या कलाकारांच्या संचातील एक ठळक नाव आहे ते हुनर हाली गांधी या अभिनेत्रीचे. हुनर या मालिकेत कैकयीची भूमिका करत आहे. कैकयी हे रामायणातील एक प्रभावी आणि स्वभावात विविध कंगोरे असलेले पात्र आहे. या भूमिकेत हुनर आपल्या अभिनयाने नक्कीच एक ताजा दृष्टिकोन घेऊन येईल.या मालिकेत कैकयीच्या पारंपरिक दुष्ट स्वभावाच्या स्त्री व्यतिरिक्त एक धाडसी योद्धा, एक समर्पित पत्नी, प्रेमळ माता अशा विविध भाव-भावनांचे पदर असलेली व्यक्ती म्हणून तिची ओळख करून दिली आहे. भावनिक संघर्ष, हिंमत आणि मातृत्व भावनेने बहकलेली कैकयी ही या महाकाव्यातील एक महत्त्वाचे पात्र आहे.

आपण साकारत असलेल्या कैकयीच्या व्यक्तिरेखेविषयी बोलताना हुनर हाली गांधी म्हणते, “या भूमिकेसाठी संधी मिळाल्याबद्दल मी देवाची मनापासून आभारी आहे. कैकेयी हे माझ्या १८ वर्षांच्या प्रवासातील सर्वात गुंतागुंतीचं आणि शक्तिशाली पात्र आहे. ती फक्त एक राणी नाही जशी लोक समजतात—ती एक धगधगती योद्धा आहे, एक समर्पित आई आहे आणि अशी स्त्री आहे जिने आपल्या निर्णयांमागे तीव्र प्रेम आणि कर्तव्याची भावना ठेवलेली आहे. जेव्हा मी नरेशन ऐकलं, तेव्हा मी अक्षरशः भारावून गेले. मी लगेच होकार दिला. शूटिंग कठीण असू शकतं, पण सेटवरची उर्जा अप्रतिम असते. आम्ही हसतो, शिकतो आणि एकमेकांना सर्वोत्तम देण्यासाठी प्रेरित करतो. या भूमिकेमुळे मला केवळ कलात्मक समाधानच मिळालं नाही, तर कुटुंब आणि करिअर, भावना आणि कर्तव्य यांच्यातील समतोल किती महत्त्वाचा आहे, हेही पुन्हा जाणवून दिलं.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शि…