Home सामाजिक सीपीआरचे नूतनीकरण ऑक्टोबर अखेर पूर्ण करा – हसन मुश्रीफ

सीपीआरचे नूतनीकरण ऑक्टोबर अखेर पूर्ण करा – हसन मुश्रीफ

30 second read
0
0
7

no images were found

सीपीआरचे नूतनीकरण ऑक्टोबर अखेर पूर्ण करा

– हसन मुश्रीफ

 

 

 कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर) परिसरातील विविध इमारतींच्या नूतनीकरणाची सर्व कामे ऑक्टोबर अखेर पूर्ण करा, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.

   छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर) परिसरातील विविध इमारतींच्या नूतनीकरणाच्या कामांची आढावा बैठक वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली सीपीआर मध्ये पार पडली यावेळी सीपीआरचे अधिष्ठाता डॉ.एस. एस. मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र मदने, माजी वैद्यकीय अधीक्षक तथा सहयोगी प्राध्यापक डॉ.शिशिर मिरगुंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश कांबळे, डॉक्टर रणजीत जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता महेश कांजर, कनिष्ठ अभियंता आशिष पाटील विद्युत विभागाचे उपअभियंता नवनाथ बनसोडे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

      मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, सीपीआर मधील इमारतींचे नूतनीकरण होण्यासाठी सध्या दाखल असणाऱ्या रुग्णांचे स्थलांतर करणे आवश्यक आहे. यासाठी रुग्णांच्या स्थलांतराचे योग्य नियोजन करा. या इमारती ठेकेदाराच्या ताब्यात दिल्यानंतर येथील कामांचा पाठपुरावा सीपीआर प्रशासनाने घ्यावा. यासाठी नोंदवही अद्ययावत ठेवा. इमारत कामासाठी ताब्यात दिल्याची तारीख व कामांची दैनंदिन सद्यस्थिती आदी नोंदी ठेवा. गळती होत असलेल्या इमारतींची दुरुस्ती करा. इमारतींवर सोलर पॅनल बसवून घ्या. सीपीआर मधील इमारतींची कामे, परिसरातील रस्ते बांधिव गटर व फूटपाथ तसेच या परिसरातील सर्व कामे दर्जेदार होतील याकडे लक्ष द्या, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

      सीपीआर परिसरातील कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी सीपीआर प्रशासनाने इमारतींचा ताबा लवकरात लवकर मिळावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले. याबाबत बोलताना सीपीआर परिसरातील नूतनीकरणाची कामे गतीने पूर्ण होण्यासाठी रुग्णांची गैरसोय न होवू देता त्यांचे पर्यायी जागेत स्थलांतर करुन इमारतींचा ताबा देण्यात येईल, असे अधिष्ठाता डॉ.एस. एस. मोरे यांनी सांगितले.

      महेश कांजर यांनी कामांच्या सद्यस्थितीची माहिती दिली.

सीपीआर परिसरातील कामे व रुग्ण स्थलांतरित केल्यानंतर कामे पूर्ण होण्याचा अवधी –

नर्सिंग इमारत दुसरा मजला –  15 दिवस

 • अधिष्ठाता कार्यालय – 30  दिवस

 कोयना इमारत बी विंग तिसरा मजला – 60  दिवस

 

 कोयना इमारत ए विंग तिसरा मजला – 60  दिवस

कोयना इमारत बालरोग विभाग पहिला मजला – 60  दिवस

कृष्णा इमारत – 8 दिवस

ग्रंथालय – 30  दिवस

सर्जिकल भांडार व औषधभांडार – 45 दिवस

गोदावरी इमारत मधील नेत्र बाहयरुग्ण विभाग, फिजोथेरेपी विभाग- 30  दिवस

बाह्यरुग्ण (ओपीडी) विभाग पहिला मजला – 60  दिवस

बाह्यरुग्ण विभाग दुसरा मजला – 60  दिवस

हेरिटेज इमारत वैद्यकीय अधिक्षक कार्यायल, जन्ममृत्यु नोंदणी विभाग, एमजीपीजीवाय विभाग, स्थायी मंडळ- 90  दिवस

जळीत विभाग (बर्न विभाग)- 15 दिवस

तुळशी इमारत तिसरा मजला-  60 दिवस

तुळशी इमारत दुसरा मजला -45 दिवस

तुळशी इमारत पहिला मजला – 45 दिवस

भोगावती इमारत लेबर रुम, धनुर्वात लसीकरण कक्ष व स्त्रीरोग व प्रसुतीकक्ष – 90 दिवस

एचइआर इमारत – 15 दिवस

वेंदगगा इमारत पहिला मजला – 30 दिवस

वेंदगगा इमारत दुसरा मजला – 60 दिवस

दुधगंगा पहिला मजला – 45 दिवस

दुधगंगा दुसरा मजला – 45 दिवस

शेड नर्सिंग इमारत, गोदावरी इमारत शेड, सरस्वती इमारत शेड, कृष्णा इमारत शेड, कुंभी इमारत शेड, हिरणकेशी इमारत शेड, ग्रंथालय इमारत शेड पूर्ण आहे.

 

तुळशी इमारत शेड – 15 दिवस

भोगावती इमारत शेड – 15 दिवस

एचइआर इमारत शेड – 15 दिवस

कोयना इमारत शेड – 30 दिवस

वेदंगगा इमारत्त शेड – 30 दिवस

दुधंगगा इमारत शेड – 30 दिवस

नेत्रज्योती इमारत शेड – 30 दिवस

ड्रेनेज लाईन – सद्यस्थितीमध्ये 60 टक्के काम पूर्ण  व उर्वरित काम 40 दिवसात पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डेटॉल फ्रेश भारतीयांना 12 तास ताजेपणा देऊन ‘नेहमीच तयार’ रहाण्यासाठी देते प्रोत्साहन

डेटॉल फ्रेश भारतीयांना 12 तास ताजेपणा देऊन ‘नेहमीच तयार’ रहाण्यासाठी देते प्रोत्साहन  …