Home उद्योग जगातील सर्वात मोठे कंटेनर जहाज एमएससी इरिनाचे (MSC IRINA) विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदरात ऐतिहासिक पदार्पण

जगातील सर्वात मोठे कंटेनर जहाज एमएससी इरिनाचे (MSC IRINA) विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदरात ऐतिहासिक पदार्पण

4 second read
0
0
13

no images were found

जगातील सर्वात मोठे कंटेनर जहाज एमएससी इरिनाचे (MSC IRINA) विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदरात ऐतिहासिक पदार्पण

अहमदाबाद,:जगातील टीईयू (ट्वेंटी-फूट इक्विव्हलेंट युनिट) क्षमतेनुसार सर्वात मोठे कंटेनर जहाज म्हणून ओळखले जाणारे एमएससी इरिना हे जहाज सोमवारी सकाळी विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदरात दाखल झाले आणि ते मंगळवारपर्यंत तेथे थांबणार आहे.या कंटेनर जहाजाचं आगमन या बंदरासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 मे रोजी हे बंदर राष्ट्राला समर्पित केले होते.एमएससी इरिना ची एकूण क्षमताच 24,346 टीईयू (20 फूट समतुल्य युनिट) असून, हे जहाज जागतिक शिपिंग क्षेत्रातील एक शक्तिशाली घटक आहे. याची लांबी 399.9 मीटर आणि रुंदी 61.3 मीटर आहे. हे जहाज फिफाद्वारे मान्यताप्राप्त मानक फुटबॉल मैदानापेक्षा जवळजवळ चारपट लांब आहे.. हे जहाज आशिया आणि युरोपदरम्यान मोठ्या प्रमाणात कंटेनर वाहतुकीसाठी खास डिझाइन करण्यात आले असून, व्यापार मार्ग सुलभ करणे आणि लॉजिस्टिक कार्यक्षमतेत वाढ करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

हे जहाज दक्षिण आशियातील बंदरात प्रथमच आले आहे, ज्यामुळे विझिंजम बंदराची अल्ट्रा-लार्ज कंटेनर व्हेसेल्स (युएलसीव्ही) हाताळण्याची क्षमता अधोरेखित होते. या बंदरात याआधीही एमएससी तुर्कीए आणि एमएससी मिशेल कॅपेलिनी यांसारखी आयकॉन-क्लास जहाजे आली आहेत, ज्यामुळे हे बंदर सागरी व्यापारातील एक महत्त्वाचे केंद्र ठरत आहे.एमएससी इरिना’ मार्च 2023 मध्ये लाँच करण्यात आले आणि त्याच वर्षी एप्रिलमध्ये त्याचा पहिला प्रवास सुरू झाला. हे जहाज एकाच वेळी 26 (टियर उंचीपर्यंत) थरांमध्ये कंटेनर साठवू शकते, जे कंटेनर स्टॅकिंगमध्ये एक अद्वितीय क्षमता दर्शवते.लक्षवेधी बाब म्हणजे एमएससी इरिनाने आपल्या पूर्ववर्ती ‘ओओसीएल स्पेन’ ला 150 टीईयूच्या फरकाने मागे टाकले आहे. पर्यावरणीय मानकांना अनुसरून, या जहाजात ऊर्जा-बचतीसाठी विशेष वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे कार्बन उत्सर्जनात सुमारे 4% घट होते आणि कार्यक्षमतेवर परिणाम न करता पर्यावरणाचा भार कमी होतो.

एमएससी एरिनाचे विझिंजम बंदरातील आगमन केवळ या बंदराचे जागतिक शिपिंगमधील धोरणात्मक महत्त्व अधोरेखित करत नाही, तर सस्टेनेबल मेरीटाइम प्रॅक्टिसेसकडे एक महत्त्वाची झेप दर्शवते आणि या क्षेत्रातील भविष्यातील विकासासाठी एक नवीन मानदंड तयार करते.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने 16 जून ते दि.31 जुलै अखेर अतिसार नियंत्रण मोहिम

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने 16 जून ते दि.31 जुलै अखेर अतिसार नियंत्रण मोहिम कोल्ह…