Home क्राईम ५० हजारांची लाच स्वीकारताना बारवीमधील उप कार्यकारी अभियंत्याला अटक

५० हजारांची लाच स्वीकारताना बारवीमधील उप कार्यकारी अभियंत्याला अटक

0 second read
0
0
70

no images were found

५० हजारांची लाच स्वीकारताना बारवीमधील उप कार्यकारी अभियंत्याला अटक

बदलापूर : संजय माने असे या लाचखोर अभियंत्याचे नाव असून ते बारवी धरण विभाग अंबरनाथ येथे कार्यरत होते.

संजय माने यांच्याकडे बारवी धरण येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विश्रामगृहाची स्वच्छता आणि देखभाल करण्याचे कंत्राट आहे. या स्थापत्य कंत्राटदाराकडून ५० हजारांची लाच स्वीकारताना एमआयडीसीच्या उप कार्यकारी अभियंत्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. संजय माने असे या लाचखोर अभियंत्याचे नाव असून ते बारवी धरण विभाग अंबरनाथ येथे कार्यरत होते. त्यांनी तक्रारदाराकडून ७८ हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारावी धरणाचे व्यवस्थापन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून पाहिले जाते. या बारावी धरणाला आता ५० वर्षे पूर्ण झालेली असून बारावी धरण येथे एमआयडीसीचे विश्रामगृह आहे.

या विश्रामगृहाच्या स्वच्छता व देखभालीचे कंत्राट एका स्थापत्य कंत्राटदाराला देण्यात आले होते. निवेदनुसार दोन लाख २० हजार ३२६ रुपयांचे बिल कोणत्याही त्रुटीशिवाय मंजूर करण्याकरिता बक्षीस म्हणून तसेच कंत्राटदाराने काम मिळवते वेळी भरलेली अनामत रक्कम परत मिळवून देण्यासाठी बारवी धरण विभागाचे उप कार्यकारी अभियंता संजय माने यांनी ७८ हजार लाचेच्या रक्कमेची मागणी केल्याची तक्रार कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवी मुंबई कार्यालयात तक्रार दिली होती.

या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पडताळणीसाठी सापला रचण्यात आला. या अनुषंगाने १७ ऑक्टोबर रोजी शासकीय पंचासमक्ष लाचेच्या मागणीची  सत्यता पडताळण्यात आली. या कारवाई दरम्यान लोकसेवक संजय माने यांनी तक्रारदार यांचेकडे ७८ हजार रुपये लाचेच्या रक्कमेची मागणी केली होती. त्यामध्ये तडजोडीअंती ५० हजार रुपये स्विकारण्याचे त्यांनी कबूल केले. हीच ५० हजार रु. लाचेची रक्कम त्यांच्या कार्यालयात स्विकारताना संजय माने यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोण होतीस तू, काय झालीस तू! मालिकेसाठी अभिनेत्री गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचं प्रशिक्षण

कोण होतीस तू, काय झालीस तू! मालिकेसाठी अभिनेत्री गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचं प्रशिक्षण &…