no images were found
कोल्हापूर जिल्ह्यातील चारपैकी 3 ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर
कोल्हापूर : जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील फये ग्रामपंचायतीमध्ये शिंदे गटाने सत्ता मिळवली. सरपंचपदी शिंदे गटाच्या नकुशी धुरे विजयी झाल्या. पंचायतमधील ७ पैकी जागा शिंदे आणि ३ भाजप गटाने जिंकल्या. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने ४ जागा जिंकल्या. मात्र, सरपंच शिंदे आणि भाजप गटाचा विजयी झाला. राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिंदे गट आणि भाजप यांच्यात लढत झाली.
इसापूर ग्रामपंचायतीमध्ये एकूण जागा ७ जागांवरील निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये सर्वपक्षीय स्थानिक विकास आघाडीने ५ जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडीला २ जागा मिळाल्या. सर्वपक्षीय स्थानिक विकास आघाडीचा सरपंच निवडून आला.
बरगेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच म्हणून अपक्ष उमेदवार जयवंत बरगे विजयी झाले आहेत. निवडणुकीपूर्वी ३ जागा बिनविरोध झाल्या होत्या. तीन जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. दरम्यान, सर्वसाधारण महिला उमेदवार नसल्याने एक जागा रिक्त आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील नोव्हेंतबर ते डिसेंबरअखेर मुदत संपणाऱ्या ४७५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार ३१ मे २०२२ पर्यंत अस्तिहत्वासत असलेली मतदार यादी गृहित धरण्यात येणार आहे. अंतिम मतदार यादी २१ ऑक्टोतबरला प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर निवडणुकीस पात्र असणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात १ , नोव्हेंबर महिन्यात ४२९ तर डिसेंबर महिन्यामध्ये ४५ ग्रामपंचायतीचा कालावधी संपणार आहे. मुदती संपतील तसे त्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात येणार आहेत.