Home शैक्षणिक मध्य प्रदेशात एमबीबीएसचं शिक्षण हिंदीत

मध्य प्रदेशात एमबीबीएसचं शिक्षण हिंदीत

0 second read
0
0
258

no images were found

मध्य प्रदेशात एमबीबीएसचं शिक्षण हिंदीत

भोपाल : देशात पहिल्यांदाच मध्य प्रदेश सरकारने एमबीबीएसचं शिक्षण हिंदीत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भोपाळमध्ये प्रथम वर्षाच्या मेडिकलच्या हिंदी भाषेतील पुस्तकांचं प्रकाशन केलं.

“आजचा दिवस भारताच्या शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचा आहे. नवीन शैक्षणिक धोरणात प्राथमिक शिक्षण, तांत्रिक आणि वैद्यकीय शिक्षणात मातृभाषेला महत्त्व देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेश सरकारने यासंदर्भात पुढाकार घेऊन एमबीबीएसचं शिक्षण हिंदी भाषेत उपलब्ध करून दिलं आहे”, असं गृहमंत्री म्हणाले.

शहा पुढे म्हणालेकी , “देशातील शिक्षण क्षेत्राच्या पुनर्रनचनेचा क्षण आहे. भाषेमुळे एकही मुलगा वंचित राहणार नाही. कोणत्याही व्यक्तीची विचार करण्याची प्रक्रिया मातृभाषेतून घडते. देशात आता वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि कायद्याचे शिक्षण हिंदीसह देशातील विविध राज्यांमध्ये मातृभाषेतून मिळू शकेल असं शहा म्हणाले”.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…