
no images were found
हेमंत पाटील यांनी घेतली संजय जोशींची भेट
राजकीय, सामाजिक विषयावर सखोल चर्चा
पुणे, : इंडिया अगेन्स्ट करप्शनचे (आयएसी) राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी सोमवारी (ता.२८) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि भाजपचे माजी राष्ट्रीय महासचिव संजय जोशी यांची नुकतीच सदिच्छा भेट घेतली.देशातील सद्यस्थिती, सामाजिक कार्य तसेच राजकीय घडामोडीसह राष्ट्रीय सुरक्षे संदर्भात पाटील यांनी जोशी यांच्याशी चर्चा केली.
संजय जोशी यांच्याशी पाटील यांचे घनिष्ठ संबंध आहे.पाटील यांच्यावर जोशी यांचा राजकीय मार्गदर्शक म्हणून मोठा प्रभाव आहे. भेटी दरम्यान संजय जोशी यांनी पाटील यांना सामाजिक कार्यात अधिक सक्रीय होण्याचे आणि राष्ट्रहितासाठी काम करण्याकरीता प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
यावेळी हेमंत पाटील यांनी विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.क्रीडा तसेच भ्रष्टाचारविरोधी चळवळीत त्यांनी घेतलेल्या पुढाकाराचे विशेष उल्लेख झाले.भविष्यात समाजकार्यातील समन्वय वाढवण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती पाटील यांनी दिली.