
no images were found
महाराष्ट्र दिनाला प्रवाह पिक्चरवर पहा महाराष्ट्राचा लाडका सिनेमा अशी ही बनवाबनवी
गेली ३६ वर्ष महाराष्ट्राचं भरभरुन मनोरंजन करणाऱ्या अशी ही बनवाबनवी सिनेमाची जादू जराही कमी झालेली नाही. जेव्हा जेव्हा हा सिनेमा टीव्हीवर पहाण्याची संधी मिळते अगदी तेव्हा तेव्हा प्रेक्षक या सिनेमाचा आनंद लुटतात. प्रेक्षकांचा हा लाडका सिनेमा १ मे ला म्हणजेच महाराष्ट्र दिनाला प्रवाह पिक्चरवर पहाता येणार आहे.
अशी ही बनवाबनवी सिनेमातले धनंजय माने इथेच रहातात का, सत्तर रुपये वारले, हा माझा बायको पार्वती हे संवाद आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. याचं श्रेय जातं ते दिग्दर्शक आणि अभिनेते सचिन पिळगांवकर, पद्मश्री महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, अभिनेत्री निवेदिता जोशी, सुप्रिया पिळगांवकर, अश्विनी भावे आणि दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे, सुशांत रे आणि सुधीर जोशी यांना. या दिग्गजांनी आपल्या सहजसोप्या अभिनयाने या कलाकृतीला अजरामर केलं. या कलावंताच्या सदाबहार अभिनयाने नटलेली ही सदाबहार कलाकृती नक्की पहा गुरुवार १ मे ला दुपारी १ आणि रात्री ८ वाजता फक्त प्रवाह पिक्चरवर.