
no images were found
भाजपने सुरू केलेल्या गाव वस्ती संपर्क अभियानांतर्गत खासदार धनंजय महाडिक यांनी दिली शिये गावाला भेट
कोल्हापूर (प्रतिनिधी):-भारतीय जनता पार्टीच्यावतीने गाव वस्ती संपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे या अभियानांतर्गत खासदार धनंजय महाडिक यांनी आज करवीर तालुक्यातील शिये गावाला भेट दिली. गावातील ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र, शाळा, मंदिरे यांना भेट देवून, खासदार धनंजय महाडिक यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. आरोग्य केंद्रातील सुविधा वाढवू, गावच्या विकासासाठी भरीव निधी देवू, अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली. दरम्यान सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींसह गावातील विविध लोकांची खासदार महाडिक यांनी भेट घेतली.
भाजपच्यावतीने गाव- वस्ती संपर्क अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत गेले दोन दिवस भाजपचे लोकप्रतिनिधी विविध गावांना भेटी देऊन तिथल्या कामकाजाचा आढावा घेत आहेत. खासदार धनंजय महाडिक यांनी आज करवीर तालुक्यातील शिये गावाला भेट दिली. भाजप युवा मोर्चा अध्यक्ष आणि जिल्हा संयोजक अक्षय पाटील यांनी खासदार महाडिक यांचे स्वागत केले. यावेळी शिवाजी बुवा, विकास पाटील, विक्रम पाटील, भिकाजी जाधव, उत्तम गाडवे, मारुती बुवा, हणमंत पाटील, जयसिंग पाटील, बाबासो चव्हाण उपस्थित होते. शिये गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला खासदार महाडिक यांनी पुष्पहार अर्पण केला.