
no images were found
उर्मिला शर्मा यांनी वयाच्या ४०व्या वर्षी अभिनय करिअर सुरू करण्यामागील कारण सांगितले!
नुकतेच उर्मिला शर्मा यांनी एण्ड टीव्हीवरील मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मध्ये दरोगा हप्पू सिंगची (योगेश त्रिपाठी) सासू अवदेशियाच्या भूमिकेत प्रवेश केला. त्या टेलिव्हिजनवरी एक प्रतिभावान चेहरा आहेत, तसेच त्यांच्या मालिकेमधील या प्रवेशामधून विश्वास सार्थ ठरतो की आपली स्वप्ने साकारताना वयाचे कोणतेच बंधन नसते. प्रतिभावान आणि दृढनिश्चयी उर्मिला यांचा स्क्रिनपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता, ज्यामध्ये धैर्य, त्याग समाविष्ट असण्यासोबत त्यांच्या कुटुंबाने त्यांना अविरत पाठिंबा दिला.
अभिनय क्षेत्रात आलेल्या भावनिक प्रवासाबाबत सांगताना उर्मिला शर्मा ऊर्फ अवदेशिया म्हणाल्या, “माझे वयाच्या सतराव्या वर्षी लग्न झाले आणि लवकरच आई देखील बनले. अभिनय माझे नेहमी स्वप्न होते, पण इंडस्ट्री कशाप्रकारे काम करते याबाबत मला काहीच माहित नव्हते, मला कोणताच अनुभव नव्हता आणि पार्श्वभूमी देखील नव्हती. पण स्वत:साठी काहीतरी करण्याची उर्मी नेहमी होती. जीवन जबाबदाऱ्यांसह पुढे जात राहिले, पण वयाच्या ४०व्या वर्षी मी धाडस केले आणि २००६ मध्ये मुंबईत जाण्याचे धाडसी पाऊल उचलले. मी स्वत:हून अभिनयामध्ये माझे नशीब अजमावण्याचा प्रयत्न केला. तो सोपा निर्णय नव्हता, माझ्या मुलांना मागे सोडणे सर्वात आव्हानात्मक होते. पण माझे पती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, तसेच इतरांनी माझे मनोबल कमी करण्याचा प्रयत्न केला, ते म्हणायचे की ‘आता खूप उशीर झाला आहे, अभिनय व्यावहारिक स्वप्न नाही’. कुठून सुरूवात करावी याबाबत मला काहीच कल्पना नव्हती, पण मी साधा पोर्टफोलिओ तयार केला आणि ऑडिशन्स द्यायला सुरूवात केली. हळूहळू, मला लहान संधी मिळू लागल्या. माझा पहिला प्रकल्प भोजपुरी अल्बम गीत होता आणि मला आजही सेटवर जाणवलेला नर्व्हसनेस आठवतो. लवकरच, मला बंगालमध्ये बंगाली मालिकांमध्ये भूमिका मिळण्यास सुरूवात झाली आणि त्यामधून मला पुढे जात राहण्याचा आत्मविश्वास मिळाला. प्रत्येक भूमिका, मुंबईतील प्रत्येक दिवस या क्षणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण राहिला आहे, जेथे अखेर मी प्रकाशझोतात आले आणि माझ्या कलेला महत्त्व देण्यात आले.” आपल्या प्रवासाबाबत सांगताना त्या पुढे म्हणाल्या, “माझ्या मुलांपासून दूर राहण्याच्या वेदना मला आजही जाणवतात, पण मला स्वत:साठी आणि त्यांच्यासाठी काहीतरी करायचे होते, तसेच त्यांना दाखवून द्यायचे होते की स्वप्न साकारण्यासाठी कधीच उशीर होत नाही. आज, मी मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’च्या सेटवर जाते तेव्हा ही सर्व एकाकीपणाची वर्ष, दु:ख, नकार आणि अनेक रात्री झोप न लागणे या सर्वांचे फळ मिळाल्यासारखे वाटते. मी जे कोणी बनले आहे त्याचा मला खूप अभिमान वाटतो. खूप उशीर झाला आहे असे विचार करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला सांगू इच्छिते की कृपया हार मानू नका. जीवनाला डेडलाइन नसते. तुमची स्वप्नं महत्त्वाची आहेत, तुमच्या इच्छा महत्त्वाच्या आहेत आणि तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीचा पाठिंबा असला तर यशस्वी करिअर घडवण्याच्या दिशेने पाऊल उचला.”