
no images were found
जयंती नाल्यातून अंदाजे 10 टन पेक्षा जास्त प्लॅस्टिक बाहेर काढण्याचे काम सुरु
कोल्हापूर (प्रतिनिधी):- शहरामध्ये महानगरपालिकेच्यावतीने दरवर्षी पावसाळयापुर्वी पोकलॅन्ड, जेसीबी व कर्मचा-यांच्या सहाय्याने नाले सफाई करण्यात येते. यावर्षीही पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाले सफाई करण्याच्या सूचना प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे व सहा.आयुक्त कृष्णात पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरु करण्यात आले आहे. या नाले सफाईमधून आज अखेर 640 टन गाळ उठाव करण्यात आला आहे. यामध्ये सुतार वाडा, कल्याण ज्वेलर्सच्या पाठीमागे, जयंती नाल्यातील गाळ काताना याठिकाणी अंदाजे 10 टन पेक्षा जास्त प्लॅस्टिक मटेरियल नाल्यातून वाहून आले आहे. हे सर्व प्लॅस्टीक नाल्यातून बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.
महापालिकेच्यावतीने शहर मधील सर्वच लहान व मोठया नाल्यांची सफाई करण्यात येत आहे. यामध्ये 60 कर्मचाऱ्यांमार्फत 476 लहान नाले, जेसीबीच्या सहाय्याने 236 मध्यम नाले व चॅनल सफाई करण्यात येत आहे. यामध्ये दोन जेसीबी मशीनद्वारे व मुनष्यबळाद्वारे राजेंद्रनगर, दत्त गल्ली, एसएससी बोर्ड, सम्राट नगर, जवाहरनगर, सदरबाजार, भारतनगर, देशमाने कॉलनी, टुलीप कॉर्नर, देवणे कॉलनी, वसंत वैभव अपार्टमेंट परिसर, योगेश्वर कॉलनी, गुलाबनगर, जगताप नगर, सिध्दार्थनगर, टाकाळा परिसर, शाहू समाधी स्थळ परिसर, दौलतनगर, बुध्दविहार परिसर, महावीर गार्डन, शास्त्रीनगर, विश्वकर्मा सोसायटी परिसर, वर्षानगर, शाहूनगर, तोरणानगर, राजारामपूरी 7,8,9,10, 13 वी गल्ली, जवाहरनगर, आगा कॉलनी, कसबा बावडा रेणुका मंदीर समोर, लक्ष्मी वसाहत, सुभाषनगर, खरी कॉर्नर, आंबेडकर नगर, बिंदू चौक पार्किंग, ओम गणेश कॉलनी, वारेवसाहत, गवत मंडई, कुंभार गल्ली, मगदूम लॉन, सिंधू नगरी, स्वाती विहार अपार्टमेंट, ऑक्सीजन पार्क, सम्राट कॉलनी, कृष्ण कृष्णाई कॉलनी, यादवनगर, कोटीतीर्थ तलाव समोर, पार्वती टॉकी मागील बाजू, डवरी वसाहत, नेहरुनगर, डोंबारवाडा, छाया कॉलनी, सर्वसाक्षी गणेश मंदीर समोर, महाकाली मंदीर परिसर, बेलबाग, राजलक्ष्मी नगर, शेळके उद्यानसमोर अशा 90 नाल्यांची सफाईचे काम पुर्ण करण्यात आले आहे. तर मोठया नाल्यांची सफाई करण्यासाठी 2 पोकलँड मशीनद्वारे जयंती नाला व गाडीअड्डा येथील नाल्यांची सफाई सुरु आहे.
तरी शहरातील सर्व नागरीकांनी नाला अथवा नाला परिसरात कोणत्याही प्रकारचा कचरा, प्लॅस्टीक अथवा इतर टाकाऊ पदार्थ टाकू नये असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.