no images were found
अंबाबाई मंदिरात चोरी करणाऱ्या दोन महिलांना सीसीटीव्हीद्वारे रंगेहाथ पकडले
कोल्हापूर : करवीर निवासिनी अम्म्बाबाई मंदिरात गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पडले. त्यांच्या कडून मुद्देमाल जप्त केला केला आहे. मंदिरातील सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष आधिकारी व त्त्त्यांच्या सहकार्यांनी ही कारवाई केली.
नवरात्र उत्सव झाल्यानंतर अध्याप भक्तांची गर्दी आहे. आज शनिवार दि. १५ रोजी सकाळी नऊ ते दहाच्या सुमारास आधुनिक पेहराव केलेल्या दोन महिला चोरीचा प्रयत्न करत असताना सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष येथे निदर्शनास आल्या. देवस्थान सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष यांच्या सतर्कतेमुळे व पोलिसांच्या मदतीने सदर महिलांना तात्काळ रंगेहात मुद्देमालासहित पकडण्यात आले. भक्ताच्या तक्रारीनुसार पाहणी केले असता अवघ्या दहा मिनिटात या गुन्हाचा उलगडा करण्यात आला.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, मंदिर पोलिस इन्चार्ज राजेंद्र कांबळे महिला पोलीस सहाय्यक फौजदार नंदिनी मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल देवानंद बल्लारी देवस्थान सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष विभाग प्रमुख राहुल जगताप सहायक अभिजीत पाटील, अवधूत चौगुले अनिकेत बागल व सेक्युरिटी रोहित आवळे,गोसावी यांच्या साह्याने हा गुन्हा उलगडकीस आला आहे. या चोर महिलांडून अशा तर्हेचे चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस आले असून जुना राजवाडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.