
no images were found
२ दिवसाच्या विशेष कॅम्पमध्ये 108 बांधकाम परवाने
कोल्हापूर : नगररचना विभागामार्फत आयोजित दोन दिवसाच्या विशेष कॅम्पमध्ये 108 बांधकाम परवानग्या देण्यात आल्या. शुक्रवारी कॅम्पमध्ये 46 बांधकाम परवानग्या, 17 भोगवटा प्रमाणपत्र, 8 विभाजन, 6 बांधकाम परवानगींना मुदतवाढ व 9 अनामत रक्कम परत देण्यात आल्या. या कॅम्पमध्ये भोगवटा प्रमाणपत्र, बांधकाम परवानगी, जोता चेकिंग, अनामत रक्कम मागणी अर्ज, ले आऊट मंजूरी, एकत्रीकरण व विभाजनबाबतची प्रकरणे मंजूर करण्यात आली. महानगरपालिका क्षेत्रातील ऑनलाईन पुर्वी दाखल झालेल्या विकास परवानगी (इमारत बांधकाम व भोगवटा) कामी नगररचना विभागामार्फत दोन दिवसाचे विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पमध्ये 1000 चौ.मी. भूखंड क्षेत्रापर्यंतची विकास प्रकरणे घेण्यात आली. नगररचना विभागामार्फत दोन दिवसात 108 बांधकाम परवानग्या, 34 भोगवटा प्रमाणपत्र, 16 विभाजन, 8 बांधकाम परवानगींना मुदतवाढ व 12 अनामत रक्कम परत करण्यात आल्या.
या कॅम्पमध्ये सहाय्यक संचालक नगररचना रामचंद्र महाजन, उपशहर रचनाकार रमेश मस्कर व कनिष्ठ अभियंता यांनी दाखल झालेली प्रकरणे तपासून मंजूर केली. या कॅम्पला नागरिक व आर्किटेक्चर यांचेकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.