no images were found
सर्वसामान्य कुटुंबातील मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण सरकारचा ऐतिहासिक निर्णय : विजय जाधव
कोल्हापूर :राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी घेतलेल्या राज्यातील सर्व मुलींना चालू शैक्षणिक वर्षापासून मोफत उच्च शिक्षण या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आनंद उत्सव साजरा करण्यात आला. भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी विवेकानंद कॉलेज, नागाळा पार्क याठिकाणी एकत्र येत सर्वांनी नाम.चंद्रकांतदादा पाटील यांचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा दिल्या. जिल्हाध्यक्ष विजय जाधव प्रदेश सचिव महेश जाधव यांनी शैक्षणिक क्षेत्रातील या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल दादांचे मनस्वी अभिनंदन केले.
या शैक्षणिक निर्णयासाठी शासनाच्यावतीने २००० कोटी रुपयांची तरतूद केली असून सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे सर्वसामान्य कुटुंबातील मुलींच्या उच्च शिक्षणाचा मार्ग सुकर झाल्याचे मत याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी व्यक्त केले.
यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना पेढे वितरित करून आनंद व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी राहूल चिकोडे, सरचिटणीस गायत्री राऊत, सदानंद राजवर्धन, हेमंत आराध्ये, राजू मोरे, विराज चिखलीकर, शैलेश पाटील, विजयसिंह खाडे-पाटील, मंगला निपाणीकर, अभिजित शिंदे, रुपाराणी निकम, गिरीष साळुंखे, संतोष माळी, आजम जमादार, अशोक लोहार, संजय जासूद, दिलीप बोंद्रे, डॉ. शिवानंद पाटील, संदीप कुंभार, महेश यादव, महादेव बिरंजे, विश्वजित पवार, किशोर लाड, रविकिरण गवळी, शाहरुख गडवाले, प्रणोती पाटील, रिमा पालनकर, सौ ढवळे, वंदना बंबलवाड, पद्मजा गुहागरकर, लता बरगे, धीरज पाटील, प्रकाश घाटगे, मामा कोळवणकर, रांगोळे, किशोर लाड, रास्ते आदी उपस्थित होते.