
no images were found
टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या अर्बन क्रूझर हायरायडरमध्ये आता नव्या प्रगत वैशिष्ट्यांची भर
बंगळुरू, -टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) ने आज अर्बन क्रूझर हायरायडरमध्ये नव्या वैशिष्ट्यांची भर घातल्याची घोषणा केली असून हे बदल सुरक्षेचा, आरामाचा आणि सोयीसुविधांचा अनुभव नव्याने परिभाषित करत आहेत. या नव्या सुधारणा ग्राहक-केंद्रित नवीन उपक्रमांप्रती असलेली टोयोटाची वचनबद्धता अधोरेखित करतात. ग्राहकांचे मौल्यवान अभिप्राय आणि बदलत्या बाजाराच्या गरजा लक्षात घेऊन, या वैशिष्ट्यांची जोड दिल्यामुळे वाहन चालवण्याचा अनुभव अधिक समृद्ध होत आहे.
भारताची पहिली सेल्फ-चार्जिंग स्ट्राँग हायब्रिड इलेक्ट्रिक एसयूव्ही म्हणून अर्बन क्रूझर हायरायडरला मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळाली आहे. या वाहनाने आधीच 1 लाख युनिट्स विक्रीचा टप्पा ओलांडला असून, हे वाहन आपल्या प्रगत तंत्रज्ञान, उत्कृष्ट इंधन कार्यक्षमता, जबरदस्त परफॉर्मन्स आणि प्रीमियम ड्रायव्हिंग अनुभवामुळे ग्राहकांची मने जिंकत आहे.
टोयोटाने अर्बन क्रूझर हायरायडरमध्ये केलेल्या नव्या सुधारणांमध्ये सुरक्षा, आराम आणि तांत्रिक सुविधांचा समावेश आहे. सर्व व्हेरिएंट्समध्ये संरचनेत सुधारणा करून सुरक्षा आणखी मजबूत करण्यात आली आहे. प्रवाशांची अतिरिक्त सुविधा लक्षात घेता आता सर्व व्हेरिएंट्समध्ये 6 एअरबॅग्स मिळणार असून, काही ऑटोमॅटिक व्हेरिएंट्समध्ये इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक (EPB) दिला आहे. परफॉर्मन्समध्ये सुधारणा करत एडब्ल्यूडी व्हेरिएंटमध्ये जुन्या 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनऐवजी 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन (6AT) देण्यात आला आहे. तसेच सर्व व्हेरिएंट्समध्ये सुधारित स्पीडोमीटर, टाईप-सी फास्ट चार्जिंग पोर्ट्स (15W), एलईडी स्पॉट व रीडिंग लॅम्प्सची सुविधा देखील आता उपल्बध असणार आहे. विशेष आरामासाठी टॉप व्हेरिएंट्समध्ये 8 प्रकारे अॅडजस्ट होणारी पॉवर ड्रायव्हर सीट, मागील दरवाज्यांवर सनशेड, व्हेंटिलेटेड ड्रायव्हर आणि को-ड्रायव्हर सीट्स, अॅम्बियंट लाइटिंग सुविधा देण्यात आल्या आहेत. बहुतांश व्हेरिएंट्समध्ये रियल टाइम टायर प्रेशर मॉनिटर करण्यासाठी टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम(TPMS) देण्यात आली आहे.निवडक व्हेरिएंट्समध्ये वाहनातील हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करण्यासाठी एअर क्वालिटी इंडेक्स डिस्प्ले सुविधा देण्यात आली आहे. तसेच काही व्हेरिएंट्समध्ये ड्युअल टोन एक्सटेरिअर रंगही उपलब्ध करून देण्यात आले आहेत, जे या एसयूव्हीच्या लुकमध्ये आधुनिकतेची आणि स्टायलिश भर घालतात. या सर्व सुधारणांमुळे हायरायडरचा अनुभव अधिक प्रीमियम, सुरक्षित आणि कालानुरूप बनतो.
या नवीन वैशिष्ट्यांविषयी बोलताना टोयोटाचे उपाध्यक्ष (सेल्स, सर्व्हिस, युज्ड कार बिझनेस) श्री. वरिंदर वाधवा म्हणाले, “एसयूव्ही सेगमेंटमध्ये होणाऱ्या सततच्या बदलांमुळे आम्ही आमचे मॉडेल्स नव्याने सादर करत आहोत. नवीन अर्बन क्रूझर हायरायडर हे आमच्या सर्वोत्तम तंत्रज्ञान, प्रगत सुरक्षितता आणि उच्च दर्जाच्या आरामासाठी असलेल्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. आधुनिक ग्राहकांसाठी हे वाहन टोयोटाच्या गुणवत्ता, शाश्वतता आणि वाहन चालविण्याचा आनंदाचा मिलाफ करते. या नवीन सुधारणा लक्षात घेता, हायरायडर अधिक मोठ्या ग्राहकवर्गाला आकर्षित करेल आणि भारतातील सर्वोत्तम एसयूव्ही पैकी एक म्हणून आपले स्थान आणखी मजबूत करेल. केवळ अधिक इंधन बचत आणि कार्यक्षमतेपुरते मर्यादित न राहता ही एसयूव्ही हायब्रिड तंत्रज्ञान, सुरक्षा आणि कनेक्टेड मोबिलिटी यामध्ये नवे मापदंड तयार करते आणि आताच्या ग्राहकांच्या भविष्यातील गरजा लक्षात घेता त्यांना सर्वोत्तम वाहन चालविण्याचा अनुभव प्रदान करते. ”
2021 मध्ये लाँच झालेल्या अर्बन क्रूझर हायरायडरमध्ये टोयोटाच्या जागतिक एसयूव्ही परंपरेचा, ठळक शैलीचा आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा समावेश आहे.
या वाहनात सेल्फ-चार्जिंग स्ट्राँग हायब्रिड इलेक्ट्रिक पॉवरट्रेन, 1.5 लिटर के-सिरीज इंजिन(निओ ड्राइव्ह ISG) सह, 5-स्पीड मॅन्युअल व 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि 2 व्हील ड्राइव्ह व 4 व्हील ड्राइव्ह ऑप्शन्स दिले गेले आहेत.
बाह्य रचनेत एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, दिवसा सुरु रहाणारे दोन एलईडी लाईट्स, स्पोर्टी स्किड प्लेट, क्रिस्टल अॅक्रेलिक ग्रिल आणि 17-इंच अॅलॉय व्हील्स दिले आहेत. हे सात सिंगल-टोन आणि चार ड्युअल-टोन रंगांमध्ये उपलब्ध आहेत.
प्रिमियम इंटेरिअरमध्ये 9-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस चार्जिंग, व्हेंटिलेटेड लेदर सीट्स, 360-डिग्री कॅमेरा, अॅम्बियंट लाइटिंग, क्रूझ कंट्रोल, हेड-अप डिस्प्ले आणि गुगल व सीरी व्हॉईस असिस्टंट्स मिळतात. मागील प्रवाशांसाठी रीक्लाइनिंग सीट्स, रिअर एसी व्हेंट्स, यूएसबी चार्जिंग आणि 60:40 स्प्लिट सीट्स दिल्या आहेत.
टोयोटा ग्राहकांचा अनुभव सुधारण्यासाठी 66 खास अॅक्सेसरीज, 3 वर्षे / 1,00,000 किमी वॉरंटी (5 वर्षे / 2,20,000 किमी पर्यंत वाढवता येणारी) आणि 8 वर्षे / 1,60,000 किमी हायब्रिड बॅटरी वॉरंटी देते.
सुधारित वैशिष्ट्यांसह अर्बन क्रूझर हायरायडरची सुरुवातीची किंमत रु. 11.34 लाख (एक्स-शोरूम) आहे.
सुधारित वैशिष्ट्यांसह सादर अर्बन क्रूझर हायरायडरची बुकिंग आता सुरू झाली आहे. ग्राहकांनी आपल्या जवळच्या टोयोटा डीलरशी संपर्क साधावा किंवा ऑनलाईन बुकिंगसाठी या संकेतस्थळास भेट द्यावी – https://www.toyotabharat.com