Home मनोरंजन ‘गाथा नवनाथांची’ मालिकेतील कलाकारांची नरसोबाचीवाडीस भेट

‘गाथा नवनाथांची’ मालिकेतील कलाकारांची नरसोबाचीवाडीस भेट

0 second read
0
0
165

no images were found

गाथा नवनाथांचीमालिकेतील कलाकारांची नरसोबाचीवाडीस भेट

सोनी मराठी वाहिनीवरील ‘गाथा नवनाथांची’ या मालिकेने प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केलं असून नाथसंप्रदायाविषयी मिळणारी माहिती या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. मच्छिन्द्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, रेवणनाथ या नाथांच्या कथा आणि त्यांचे महनीय कार्य प्रेक्षकांना पाहणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरते आहे. आत्तापर्यंत नाथपरंपरा, नाथांचे चमत्कार, त्यांच्या शक्तीची अनुभूती हे सर्व मालिकेत पाहायला मिळाले. यापुढेही नाथांचे वेगवेगळे चमत्कार मालिकेत पाहायला मिळतील. अशातच मालिकेतील कलाकार नकुल घाणेकर आणि जयेश शेवलकर यांनीनरसोबाची वाडी देवस्थान, कोल्हापूर येथे भेट दिली आहे. या देवस्थानी कलाकारांच्या उपस्थितीत कीर्तनकारांनी मालिकेची कथा कीर्तन स्वरूपात रसिक प्रेक्षकांना ऐकवून तल्लीन केलं. ‘गाथा नवनाथांची’ मालिकेच्या पुढील भागांत नाथ संप्रदायाची परंपरा पाहायला मिळणार असून मालिकेत आता कोणते चमत्कार घडणार, अशुभ शक्तींचा नाश नाथ कसा करणार, हे पाहणे रंजक ठरेल.

Load More Related Articles

Check Also

ठाकरे बंधूंनी हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपसोबत यावे! : हेमंत पाटील 

ठाकरे बंधूंनी हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपसोबत यावे! : हेमंत पाटील    मुंबई, : मन…