
no images were found
तळातील समाजघटकांना परवडणारे तंत्रज्ञान अभियंत्यांनी विकसित करावे.- डाॅ. प्रतापसिंह देसाई.
कोल्हापूर (प्रतिनिधी):- श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित उचगांव येथील एनबीए मानांकित न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीच्या (एनआयटी) डिग्री विभागाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय पातळीवरील डिजीफेस्ट २०२५ या तंत्रज्ञान स्पर्धेचे उद्घाटन इंडियन सोसायटी ऑफ टेक्निकल एज्युकेशन (आयएसटीई) नवी दिल्लीचे अध्यक्ष डाॅ. प्रतापसिंह देसाई यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. तळातील समाजघटकांना परवडणारे तंत्रज्ञान अभियंत्यांनी विकसित करावे. यासाठी निर्मळ चारित्र्य व झपाट्याने बदलणाऱे तंत्रज्ञान अंगीकारणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘प्रिन्स शिवाजी’चे चेअरमन डाॅ. के. जी. पाटील होते. शिक्षकांचे प्रशिक्षण, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आयोजन अशा विविध उपक्रमांतून देशातील तंत्रशिक्षणाचा दर्जा उंचावण्यात आयएसटीईचे मोलाचे योगदान आहे, असे गौरवोद्गार डाॅ. के. जी. पाटील यांनी काढले. या स्पर्धेस आयएसटीईने मान्यता दिली असून स्पर्धेतील नाविन्यपूर्ण प्रकल्पांची नोंदणी शासनाच्या युक्ती पोर्टलवर केली जाईल, ज्यातून स्टार्टअप निर्माण होण्यास मदत मिळेल असे एनआयटीचे संचालक डाॅ. संजय दाभोळे यांनी सांगितले. महाराष्ट्र व कर्नाटकातून १५ डिग्री इंजिनिअरिंग काॅलेजमधील ४०६ विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या सहा सदरांमध्ये सहभाग नोंदवला. स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रा. प्रविण जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेचे समन्वयक प्रा. डाॅ. विवेक माने यांनी प्रास्ताविक तर प्रा. मोहन शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. अधिष्ठाता डाॅ. नितीन पाटील, प्रा. अभिजीत वालवडकर, स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.