Home मनोरंजन १८ एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘सुशीला-सुजीत’च्या ट्रेलरचे प्रकाशन

१८ एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘सुशीला-सुजीत’च्या ट्रेलरचे प्रकाशन

2 second read
0
0
14

no images were found

१८ एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘सुशीला-सुजीत’च्या ट्रेलरचे प्रकाशन

  • दमदार अभिनय, चटकदार प्रसंग, खिळवून ठेवणारे संवाद यांमुळे “सुशीला-सुजीत”ची उत्कंठा शिगेला
  • चित्रपटात स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक आदी आघाडीचे कलाकार

महाराष्ट्र: स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी आणि प्रसाद ओक यांच्या भूमिका आणि त्यांचे पहिल्यांदाच एकत्र येणे, यामुळे चर्चेत असलेल्या “सुशीला सुजीत” च्या नव्याने आलेल्या ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. या ट्रेलरमधील धमाल प्रसंग प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळवत आहेत. एका शानदार समारंभात मंगळवारी या ट्रेलरचे प्रकाशन झाले. उंची निर्मितीमूल्ये, दमदार अभिनय, खुमासदार प्रसंग आणि खिळवून ठेवणारे संवाद ही “सुशीला-सुजीत”ची वैशिष्ट्ये या ट्रेलरमधून अधोरेखित होतात. चित्रपट १८ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
या ट्रेलर मधून काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार, हे नक्की. एक आई पोलिसांकडे जाते आणि आपला मुलगा हरवलाय म्हणून तक्रार करते. पोलिस तिला घरात भांडण वगैरे काही झालं होतं का, म्हणून विचारतात. पार्श्वभूमीवर आवाज येतो की, मुलगा हरवलेल्या गोष्टीला तब्बल ३५ तास उलटून गेलेत.तिकडे स्वप्नील आणि सोनाली कुलकर्णी एका घरात बंद दाराआड अडकल्याचे पाहायला मिळते. त्यांचे मोबाईल बाहेर राहिले आहेत. त्यांचे सुटका करून घेण्याचे नाना प्रकारे प्रयत्न चालू आहेत. लॅच उघडून बाहेर पडायचा, गॅलरीतून काही मार्ग निघतो का पाहायचा प्रयत्न होतो. पण लॅच तुटते, गॅलरीतील कुंडी खाली राहणाऱ्या माणसाच्या डोक्यात पडते, अशा अनेक गमतीजमती समोर येतात. विविध चिंता नायकाला सतावत आहेत. त्यात स्वप्नीलला सोनाली छळते आहे, असे एकापेक्षा एक धमाल क्षण पडद्यावर साकारतात.

मध्येच अथर्व सुदामे, नम्रता संभेराव पडद्यावर येतात. दोघेही बंद दाराआड अडकल्यावर किंवा चावी घरात राहिल्यावर काय होते याचे सुतोवाच करतात. एका प्रसंगात अमृता खानविलकर दिसते. अडकलेले स्वप्नील आणि सोनाली इमारतीच्या खाली असलेल्या लोकांना हाक मारण्याचा प्रयत्न करतात, पण उपयोग होत नाही. स्वतःची सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात हे दोघे शेजाऱ्यांसाठी काही कठीण प्रसंग उभे करतात.एका प्रसंगात बाबाच्या भूमिकेत प्रसाद ओक अवतरतो. “कुठेही जाऊ नका, लवकर परत या…भविष्य बघाते सांगतायत नखाते” असा बाबांचा संवाद असतो. त्यातून हे काहीतरी वेगळे प्रकरण आहे आणि प्रसाद वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार, हे कळून चुकते.

या सर्व धमाल गोष्टी पडद्यावर सादर होतात आणि रसिकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता ताणली जाते. ट्रेलर प्रकाशित झाल्यापासून रसिकांकडून चित्रपट कधी बघायला मिळणार असं झालंय… अशा प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.‘पंचशील एन्टरटेन्मेंट’ आणि ‘बिग ब्रेन प्रॉडक्शन्स’ ने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडीओजचे असून चित्रपटाची कथा व दिग्दर्शन प्रसाद ओक यांचे आहे. पटकथा व संवाद अजय कांबळे यांचे आहेत. प्रसाद ओक, मंजिरी ओक, स्वप्नील जोशी, संजय मेमाणे, निलेश राठी हे चित्रपटाचे निर्माते आहेत.

कच्चा लिंबू, हिरकणी, चंद्रमुखी या यशस्वी चित्रपटांच्या दिग्दर्शनानंतर प्रसाद ओक दिग्दर्शन करत असलेला हा नवा चित्रपट आहे.‘सुशीला-सुजीत’च्या नावापासूनच त्याचे वेगळेपण अधोरेखित होते. अनेक गोष्टी या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच होत आहेत. स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी आणि प्रसाद ओंक पहिल्यांदाच एकत्र येत असल्याने रसिकांसाठी हा एक वेगळा अनुभव असणार आहे.” चित्रपटाचे पोस्टर, प्रसारगीत, टिझर यांना मोठा प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला होता. आता ट्रेलरच्या माध्यमातून प्रतीक्षा शिगेला पोहोचली आहे आणि तशा प्रतिक्रिया सुद्धा आम्हाला मिळत आहेत,” असे उद्गार प्रसाद ओक यांनी काढले.स्वप्नील जोशी म्हणाला, “हा चित्रपट निखळ करमणुकीची हमी देतो. ट्रेलर पाहिल्यावर हे मनोमन पटल्याशिवाय राहत नाही.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मुख्य इमारतीमधील नागरी सुविधा केंद्र देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाच दिवस बंद छत्रपती शिव…