
no images were found
प्रा. साईबाबा यांच्या मुक्ततेला सर्वोच्च न्यायालयाचा झटका
नवी दिल्लीः दिल्ली विद्यापीठातील प्रा. जी. एन. साईबाबा आणि त्यांच्या अन्य पाच सहकाऱ्यांची जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी रद्द केली. मात्र, प्रा. साईबाबा व अन्य पाच जणांच्या सुटेकच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत त्यांची तुरुंगातून सुटका करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याप्रकरमी सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी ८ डिसेंबर रोजी होणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिल्लीचे प्राध्यापक जी. एन. साईबाबा आणि अन्य पाच जणांची शिक्षा रद्द करुन त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले होते. मात्र, कोर्टाच्या या निर्णयावर महाराष्ट्र सरकारने आक्षेप घेतला होता.
राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर आज सकाळी ११ वाजता न्यायमूर्तीद्वय एम. आर. शाह आणि बेला एम. त्रिवेदी यांच्यापुढे विशेष सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारची याचिका मंजूर करत एक नोटीस जारी केली आहे. या नोटिशीत सर्व आरोपींच्या सुटकेवर बंदी घालण्यात आली आहे.