
no images were found
कपिलतीर्थ मार्केटमधील 25 दुकान गाळे थकबाकीपोटी सील
कोल्हापूर (प्रतिनिधी):- महापालिकेच्या मालकीचे सर्व मार्केटमधील गाळेधारकांना सन 2015 पासूनचे प्रलंबित भाडे भरण्याबाबत सर्व थकबाकीदारांना इस्टेट विभागामार्फत डिमांड नोटीसव्दारे कळविण्यात आले होते. परंतू इस्टेट विभागाकडून वारंवार सूचना देऊन व लेखी कळवूनही बहुतांश गाळेधारकांनी थकीत भाडे भरले नाही. त्यामुळे आज ए वॉर्ड कपिलतीर्थ मार्केट मधील 25 जणांचे दुकानगाळे सील करण्यात आले आहेत. त्याचबरोबर इतर दुकानदारांना भाडे भरण्याच्या सक्त सुचना देण्यात आलेल्या आहेत. त्याप्रमाणे सायंकाळी 6 वाजेपर्यंत 25 लाख रुपये कपिलतीर्थ मार्केटमधील थकबाकी पोटी जमा करण्यात आले. रात्री उशीरा पर्यंत पैसे भरुन घेण्याची कार्यवाही इस्टेट विभाग व नागरी सुविधा केंद्रामध्ये सुरु आहे.
सदरची कार्यवाही प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अति.आयुक्त राहूल रोकडे व सहा.आयुक्त स्वाती दुधाणे यांच्या मार्गदर्शनाखाली इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, अरुण भोसले, मनिष अतिग्रे, गिरीष नलवडे, जर्नादन भालकर, गौतम भोसले, प्रथमेश पोवार, सदानंद फाळके, आकाश शिंदे, विष्णु चित्रुक, गणेश सकट, सिकंदर सोनुले, सुशांत कवाळे, कल्पना शिरडवाडे यांनी केली.
यापुढेही गाळेधारक आपले भाडे भरत नसल्यास संबंधीत दुकान सील करण्याची कारवाई करण्यात येणार असलेचे महापालिकेच्या इस्टेट विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.