
no images were found
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून “ग्रामपंचायत ई- सुनावणीत” 17 प्रकरणांवर सुनावणी
कोल्हापूर, : सुकर जीवनमान (नाविन्यपूर्ण) उपक्रमांतर्गत ग्रामपंचातीच्या विविध विषयांबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून अर्धन्यायिक कामकाजाविषयी जिल्हाधिकारी श्री. येडगे यांच्या समोर आज दूरदृश्यप्रणालीद्वारे ई – सुनावणी घेण्यात आली. यावेळी महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे पक्षकारांना आपापल्या गावातच ग्रापंचायतीत उपस्थित राहून सुनावणीत सहभागी होता येते. या सुनीवणीसाठी आवश्यक कागदपत्रे व्हॉट्स ॲप द्वारे सादर करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच दाव्याबाबतच्या कागदपत्रांची संचिका Kolhapur.gov.in या वेबसाइटवर ‘ग्राम पंचायत ई सुनावणी’ या टॅबवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत आज 17 प्रकरणांवर तर यापूर्वी 18 प्रकरणांवर अशा एकूण 35 प्रकरणांवर आतापर्यंत ई सुनावणी घेण्यात आली आहे. या उपक्रमामुळे वेळ व पैसा दोन्हीची बचत होत असल्याने ग्रामपंचायत सदस्य, पक्षकार, विधीज्ञ व नागरिकांनी या नाविन्यपूर्ण ई सुनावणी उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले.