
no images were found
‘सीडीएसएल आयपीएफ’तर्फे मिरजमध्ये गुंतवणूक जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन;
मिरज, : ‘सीडीएसएल इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड’तर्फे (सीडीएसएल आयपीएफ) मिरज येथे विद्यार्थ्यांसाठी गुंतवणूक जागरूकता कार्यक्रम यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आला.
या सत्राचे आयोजन कन्या कॉलेज येथे करण्यात आले. आर्थिक साक्षरता वाढवणे आणि विद्यार्थ्यांना शहाणपणाने गुंतवणूक करण्याच्या मूलभूत संकल्पनांची माहिती देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमात ‘गुंतवणुकीच्या मूलभूत संकल्पना आणि डिपॉझिटरी सेवा’ या विषयावर विशेष भर देण्यात आला.
विद्यार्थ्यांना माहिती सहजपणे समजावी व त्यांच्याशी प्रभावीपणे संवाद साधता यावा, यासाठी हे सत्र मराठी भाषेत घेण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या वित्तीय संकल्पना सोप्या पद्धतीने समजून घेता आल्या. तज्ज्ञ वक्त्यांनी गुंतवणुकीची मूलभूत तत्त्वे सुलभ करून सांगितली, तसेच डिपॉझिटरी सेवांचे महत्त्वही सांगितले. आर्थिक संपत्तीची सुरक्षितता राखण्यामध्ये या सेवांची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.
वित्तीय समावेशन वाढवण्यात गुंतवणूकदारांचे शिक्षण हे महत्त्वपूर्ण योगदान देते. योग्य माहितीच्या मदतीने लोक सक्षम गुंतवणूक निर्णय घेऊ शकतील आणि #आत्मनिर्भरगुंतवणूकदार बनू शकतील, यासाठी सीडीएसएल आयपीएफ प्रयत्नशील आहे आणि त्याकरीता कटिबद्ध आहे.वित्तीय साक्षरता वाढवण्याच्या आपल्या उद्दिष्टाच्या दिशेने पुढे जात, सीडीएसएल आयपीएफ देशभरात वर्षभर अशा अनेक गुंतवणूक जागरूकता कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे.