
no images were found
सीडीएसएल आयपीएफतर्फे कोल्हापुरात गुंतवणूक जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन;
कोल्हापूर,(प्रतिनिधी):- समाजाच्या विविध गटांमध्ये वित्तीय जागरूकता वाढविण्यासाठी, ‘सीडीएसएल इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड’तर्फे (सीडीएसएल आयपीएफ) कोल्हापूर येथे अनेक ठिकाणी गुंतवणूक शिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आले.
हे कार्यक्रम शिवाजी विद्यापीठातील वायसीएसआरडी येथे, तसेच न्यू कॉलेजमधील रामेटी कृषी प्रशिक्षण केंद्रात आणि बड्स स्कूल येथे घेण्यात आला. यात विद्यार्थी, शिक्षक आणि शासकीय कर्मचारी यांचा समावेश असलेल्या विविध प्रेक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. ‘गुंतवणुकीच्या मूलभूत संकल्पना आणि डिपॉझिटरी सेवां’विषयी माहिती देणे हा या कार्यक्रमांचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमांत सहभागी झालेल्या व्यक्तींना सुरक्षितपणे आणि शहाणपणाने गुंतवणुकीच्या तंत्रांचा अवलंब करता यावा, हा यामागील हेतू होता.
कार्यक्रमातील माहिती लोकांना सहज समजावी, यासाठी ही सत्रे मराठी भाषेत घेण्यात आली. या प्रसंगी तज्ज्ञांनी डिपॉझिटरी सेवांबाबत आणि प्रभावी गुंतवणूक धोरणांबाबत सुलभ स्पष्टीकरण देऊन सहभागी व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवला; जेणेकरून या व्यक्ती स्वतःच्या आर्थिक भविष्यासाठी सक्षम निर्णय घेऊ शकतील.
आर्थिक सशक्तीकरणासाठी आर्थिक साक्षरता अत्यंत महत्त्वाची असते. म्हणूनच गुंतवणुकीच्या सुरक्षित तत्त्वांबद्दल लोकांना शिक्षित करण्यास सीडीएसएल आयपीएफ पुढे आली आहे. योग्य ज्ञानाच्या मदतीनेच सहभागी व्यक्ती गुंतवणूकदार होण्यासाठी प्रेरित होत आहेत आणि आत्मनिर्भरगुंतवणूकदार बनत आहेत.गुंतवणूकदारांच्या जागरूकतेसाठी सीडीएसएल आयपीएफ देशभरात पुढील वर्षभर अशा अनेक शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करीत राहणार आहे.