
no images were found
4 लाख 75 हजार वसुल, 10 नळ कनेक्शन खंडीत
कोल्हापूर : शहर पाणी पुरवठा विभागामार्फत पाणीपट्टी विशेष वसुली धडक मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील थकबाकीदारांच्याकडून 4 लाख 75 हजार 842 थकबाकी वसूल करण्यात आली. तसेच थकबाकी भरणा न भरलेल्या 10 थकबाकीदारांची नळ कनेक्शन खंडीत करण्यात आली.
तसेच राजारामपुरी, शाहुनगर, दौलतनगर या भागात फिरती करुन रोख रक्कम 2 लाख 11 हजार 087 इतकी वसुली करण्यात आली, गणेश नगर, शिगणापुर रोड मिराबाग परिसरात फिरती करुन रोख रक्कम रु 78 हजार 878 इतकी थकीत रक्कम वसुल करण्यात आली आहे. लक्ष्मीपुरी,सिध्दार्थ नगर या भागात फिरती करुन रोख रक्कम रु 1 लाख 12 हजार 549 इतकी वसुली करण्यात आली तर विक्रमनगर नवदुर्गा गल्ली येथे फिरती करुन रोख रक्कम रु 73 हजार 328 इतकी थकीत रक्कम वसुल करण्यात आली.
सदरची कारवाई प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई व जल अभियंता हर्षजित घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही कारवाई पाणीपटटी अधिक्षक प्रशांत पंडत, वसुली पथक प्रमुख, मिटर रिडर व फिटर यांनी केली. पाणी पुरवठा विभागाची वसुली मोहिम येथून पुढेही सुरु राहणार असलेने शहरातील व ग्रामीण भागातील सर्व थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येणार असून थकबाकीदारांनी आपली थकीत पाणी बिलाची रक्कम त्वरित भरुन कनेक्शन बंद करणे, मिळकतीवर बोजा नोंद करणे यासारखे कटू प्रसंग टाळावेत असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.