
no images were found
आयुशक्तीची नवीनतम फ्रँचायझी आता सांगलीत सुरू
सांगली, : जगभरातील आघाडीच्या आयुर्वेदिक आरोग्य केंद्रांपैकी एक असलेल्या आयुशक्तीने आता सांगलीत प्रवेश केला आहे. कंपनीने महाराष्ट्रात आपले सहावे आउटलेट सुरू केले आहे. या लाँचसह आयुशक्तीचे आता महाराष्ट्रातील प्रमुख भागांमध्ये एकूण २८ आउटलेट झाले असून त्यापैकी १४ फ्रँचायझी आहेत.
हे आउटलेट राज द्वारकेश अपार्टमेंट, ग्राउंड फ्लोअर, उत्तर शिवाजी नगर येथे आहे. या फ्रँचायझीच्या मालक डॉ. शीतल प्रशांत पाटील (बीएएमएस, एमडी) यांच्यासह आयुशक्ती टीमचे सदस्य आणि आयुशक्तीच्या कोअर टीमच्या उपस्थितीत हा उद्घाटन समारंभ पार पडला.
हे केंद्र रुग्णांना आयुर्वेदिक सल्ला आणि उपचार पुरवत राहील. या केंद्रात २ थेरपी रूम, २ कन्सल्टेशन एरिया आणि २ प्रशिक्षित आयुर्वेदिक तज्ञ असून त्यांनी आयुशक्तीच्या सह-संस्थापिका डॉ. स्मिता पंकज नरम आणि सीईओ डॉ. कृष्णा पंकज नरम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले आहे. येथे रुग्णांसाठी एक पँट्री आणि आरामदायक वेटिंग एरियासुद्धा आहे.
डीप पल्स रीडिंग (नाडी परीक्षा) पंचकर्म , स्टीम, मसाज, डिटॉक्सिफिकेशन उपचार, प्रभावी हर्बल उपाय, कस्टमाइज्ड डाएट प्लॅन, मार्मा (आयुर्वेदिक प्रेशर पॉइंट) तंत्रे यासारख्या विविध सेवा आणि उपचार या ठिकाणी उपलब्ध असतील.
आयुशक्तीने गेल्या २ वर्षांत पुणे, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर , नोएडा आणि सुरत येथे ७ नवीन आउटलेट उघडले आहेत.