
no images were found
नेस्ले इंडियाने महाकुंभ २०२५ मध्ये जपले आपुलकी आणि बांधिलकेचे नाते – सफाई कर्मचाऱ्यांचाही केला विशेष सन्मान
मुंबई-महाकुंभ २०२५ मध्ये नेस्ले इंडिया मॅगी आणि किटकॅट या प्रसिद्ध ब्रँड्सच्या माध्यमातून विविध उपक्रमांद्वारे यात्रेकरूंसोबत आपुलकी आणि बांधिलकीचे नाते जपत आनंददायक अनुभव दिला. जगातील सर्वात मोठ्या सांस्कृतिक सोहळ्यात येणाऱ्या प्रत्येक भाविकाचा अनुभव अधिक खास बनविण्यासाठी त्यांना आनंदाचे, विश्रांतीचे क्षण देणे आणि एकात्मतेच्या भावनेने ओथंबून टाकणे हा नेस्लेचा खास उद्देश होता. नेस्ले इंडियाच्या या उपक्रमाच्या केंद्रस्थानी “मॅगी महाकुंभ – २ मिनिटे आपल्या लोकांसाठी” ही लोकांना एकत्रित आणणारी विशेष मोहीम होती. या मोहिमेअंतर्गत मॅगीने यात्रेकरूंसाठी विशेष प्रभाग आणि सेल्फी पॉइंट्स तयार केले होते, जिथे भाविकांनी गरमागरम मॅगीचा आस्वाद घेतला आणि आपल्या “मॅगी मोमेंट्स” कॅमेरात साठविल्या. तसेच, सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत, नेस्ले इंडियाने सफाई कर्मचाऱ्यांना कुडकुडत्या थंडीत उब आणि पोषण मिळावे म्हणून १२,००० ब्लँकेट्सचे वितरण आणि २ मिनिटांत तयार होणाऱ्या गरमागरम मॅगीची मेजवानी दिली.
नेस्ले इंडियाच्या प्रीपेयार्ड डिशेश आणि कुकिंग एड विभागाच्या संचालक रुपाली रत्तन यांनी सांगितले, “महाकुंभादरम्यान नेस्ले मॅगीने ”२ मिनिटे आपल्या लोकांसाठी” या उपक्रमाद्वारे नेहमीप्रमाणे लोकांना एकत्रित आणले. गेली चार दशके, मॅगी हे भारतातील घराघरात जिव्हाळ्याचे नाव आणि एकात्मतेचे प्रतीक बनले आहे. या वेळेस, आम्ही महाकुंभामध्ये मॅगी कॉर्नर्स तयार केले होते, जिथे यात्रेकरूंनी एकत्र येत आपल्या अनुभवांची देवाणघेवाण करत आनंदाचे क्षण साजरे केले. याशिवाय, आपल्या जबाबदारीपूर्वक कचरा व्यवस्थापनेच्या वचनबद्धतेला जागत आम्ही कुंभमेळ्याचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना थंडीदरम्यान उब मिळावी म्हणून गरमागरम मॅगी आणि ब्लॅंकेटचे वाटप करून त्यांना सन्मानित केले. या विशेष उपक्रमामध्ये विश्रांती घेऊ इच्छिणाऱ्या यात्रेकरूंसाठी किटकॅट ब्रेक झोन तयार करण्यात आले होते. यामध्ये “टेक अ ब्रेक” या किटकॅटच्या संकल्पनेनुसार लोकांना आराम करता यावा म्हणून खास “‘रैन बसेरा निवारे” उभारण्यात आले होते. येथे बसण्यासाठी किटकॅटच्या पुनर्वापर केलेल्या रॅपर्सपासून बनवलेले बाक ठेवले गेले, ज्यांनी भाविकांच्या आरामाची सोय करत टिकाऊपणाचा संदेशही दिला.
नेस्ले इंडियाचे कन्फेक्शनरी अर्थात मिठाई आणि गोड खाद्यपदार्थ विभागाचे संचालक गोपिचंदर जगतीशन म्हणाले, “यावर्षी आम्ही आमचे ‘हॅव अ ब्रेक, हॅव अ किटकॅट’ हे तत्त्वज्ञान महाकुंभात अंमलात आणले. महाकुंभ परिसरात आम्ही विशेष किटकॅट झोन तयार केला, जिथे किटकॅटच्या पुनर्वापर केलेल्या रॅपर्सपासून बनवलेले पर्यावरणपूरक बाक ठेवण्यात आले होते. या बाकांद्वारे भाविकांच्या आरामाची सोया पण झाली आणि समाजात पर्यावरण रक्षणाचा संदेशही पोहोचला.”नेस्ले इंडियाने ‘’महाकुंभ २०२५’’ मधील भाविकांचा अनुभव अधिक खास बनविला ज्यामुळे त्यांना उबदार क्षण, आराम आणि आपुलकीचा स्पर्श मिळाला. नेस्ले इंडियाने जगभरातील भाविकांना संस्मरणीय आठवणी देण्याचे आणि समाजात एकोप्याची भावना वाढविण्याचे कार्य केले आहे.