
no images were found
घरफाळा दंडामध्ये 80 टक्के सवलत योजनेचा शेवटचा दिवस
कोल्हापूर (प्रतिनिधी): – महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने दि.15 जानेवारी ते दि.28 फेब्रुवारी 2025 या कालावधीत दंडात 80 टक्के सवलत योजना जाहिर करण्यात आली आहे. या सवलत योजनेचा शुक्रवार दि.28 फेब्रुवारी 2025 रोजी शेवटचा दिवस आहे. या सवलत योजनेच्या 42 दिवसांच्या कालावधीत 10,200 थकबाकीदार मिळकतधारकांकडून रु.14 कोटी 82 लाख थकीत रक्कम महापालिकेकडे जमा झाली आहे. घरफाळा विभागाच्यावतीने दि.01 एप्रिल 2024 ते दि.27 फेब्रुवारी 2025 या कालावधीत आज अखेर 1 लाख 1 हजार 575 मिळकतधारकांकडून रु.59 कोटी 14 लाख इतकी रक्कम जमा करण्यात आलेली आहे. तरी थकबाकीदारांनी आपली थकीत रक्कम 80 टक्के सवलत योजनेच्या शुक्रवार दि.28 फेब्रुवारी 2025 रोजीच्या शेवटच्या दिवशी भरणा करुन याचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
त्याचबरोबर दंडामध्ये 80 टक्के सवलत योजना लागु करुन ही ज्या थकबाकीदारांनी वर्षानुवर्षे आपली थकीत रक्कम भरणा केलेली नाही अशा थकबाकीदारांची विभागीय कार्यालय निहाय यादी तयार करुन ती विभागीय कार्यालयाचे नोटीस बोर्डवर व महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. यामध्ये विभागीय कार्यालय क्रं.1 गांधी मैदान अंतर्गत 1363 थकबाकीदारांकडून 11,68,31,058/-, विभागीय कार्यालय क्रं.2 छत्रपती शिवाजी मार्केटअंतर्गत 1209 थकबाकीदारांकडून 15,74,04,384/-, विभागीय कार्यालय क्रं.3 राजारामपूरी अंतर्गत 921 थकबाकीदारांकडून 24,73,72,556/- व विभागीय कार्यालय क्रं.4 छत्रपती ताराराणी मार्केट अंतर्गत 1321 थकबाकीदारांकडून 14,46,82,021/- अशी एकूण चारही विभागीय कार्यालयाअंतर्गत 4814 थकबाकीदारांकडून 66 कोटी 62 लाख 90 हजार 019 इतकी थकीत रक्कम अजूनही आहे. या प्रसिध्द करण्यात आलेल्या थकबाकीदार यादी मध्ये न्यायप्रविष्ठ प्रकरणे, दुबार बिले अथवा इतर बाबी संदर्भात हरकती असलेली नांवे वगळण्यात आलेली आहेत. प्रसिध्द झालेल्या यादीबाबत अन्य काही हरकती असल्यास त्यांनी यादी प्रसिध्द झाले दिनांकापासून 8 दिवसांत त्या त्या विभागीय कार्यालयाच्या अधीक्षकांकडे विहित कागदपत्रासह लेखी तक्रार दाखल करावी. विहीत मुदतीत तक्रार दाखल नसलेस किंवा 8 (आठ) दिवसात थकीत रकमेचा भरणा न केल्यास महानगरपालिका अधिनियमामधील अनुसूची प्रकरण 8 मधील नियम क्र.42 अन्वये बोजा नोंद करण्याची कार्यवाही व व्यावसायिक मिळकती सील करण्याची कार्यवाही घरफाळा विभागामार्फत करण्यात येणार आहे.