
no images were found
एनआयटीच्या ‘न्यूक्लियस’ क्रिडामहोत्सवाचा शानदार प्रारंभ
कोल्हापूर (प्रतिनिधी):- श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीच्या ‘न्यूक्लियस २०२५’ या वार्षिक क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन रणजी क्रिकेटपटू संग्राम अतितकर यांच्या हस्ते जनरल चॅम्पियनशिप चषकाचे अनावरण करून व हवेत फुगे सोडून झाले. खेळ हे आयुष्यातील कठीण प्रसंगांस हिमतीने तोंड देण्यास शिकवतात. विद्यार्थ्यांनी मोबाईल गेममध्ये न अडकता आपल्या आवडत्या मैदानी खेळाचा नियमित सराव करावा असे ते म्हणाले. खेळांच्या व खेळाडूंच्या विकासासाठी आमची संस्था नेहमीच प्राधान्य देत असल्याचे ‘प्रिन्स शिवाजी’चे चेअरमन डाॅ. के. जी. पाटील यांनी नमूद केले. विविध खेळांसाठी उच्च दर्जाच्या सुविधा एनआयटीमध्ये निर्माण करण्याचा मानस संचालक डाॅ. संजय दाभोळे यांनी यावेळी बोलून दाखवला. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (केडीसीए) सचिव शितल भोसले, केडीसीएचे खजाननीस मदन शेळके, एनआयटीचे अधिष्ठाता डाॅ. नितीन पाटील, फार्मसी काॅलेजचे प्राचार्य डाॅ. रविंद्र कुंभार, विभागप्रमुख, स्टाफ व खेळाडू यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्रा. युवराज गजगेश्वर यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. मोहन शिंदे यांनी केले.