Home मनोरंजन कलाकारांचे फिटनेसबाबत संकल्‍प आणि ते पूर्ण करण्‍याच्‍या दिशेने त्‍यांचा प्रवास!

कलाकारांचे फिटनेसबाबत संकल्‍प आणि ते पूर्ण करण्‍याच्‍या दिशेने त्‍यांचा प्रवास!

2 min read
0
0
22

no images were found

कलाकारांचे फिटनेसबाबत संकल्‍प आणि ते पूर्ण करण्‍याच्‍या दिशेने त्‍यांचा प्रवास!

कलाकारांसाठी फिटनेस राखणे म्‍हणजे फक्‍त पडद्यावर आकर्षक दिसण्‍यापर्यंत मर्यादित नसून ते प्रबळ, उत्‍साही आणि मानसिकदृष्‍ट्या उत्तम राहण्‍याला देखील प्राधान्‍य देतात. व्‍यस्‍त शूटिंग वेळापत्रक आणि अनपेक्षित रूटिन्‍समुळे फिटनेसबाबत संकल्‍प स्‍थापित करणे आव्‍हानात्‍मक ठरू शकते. पण, ताकद वाढवायची असो, सहनशीलता सुधारायची असो किंवा व्‍यावसायिक करिअरसोबत आरोग्‍यदायी जीवनशैली राखायची असो अनेक कलाकार त्‍यांच्‍या संकल्‍पाचे काटेकोरपणे पालन करतात. एण्‍ड टीव्‍ही कलाकार त्‍यांची फिटनेस ध्‍येये, व्‍यस्‍त शूटिंग व वर्कआऊट्समध्‍ये संतुलन राखण्‍याची आव्‍हाने आणि त्‍यांनी अनुभवलेले शारीरिक व मानसिक बदल याबाबत सांगत आहेत. हे कलाकार आहेत विक्रम द्विवेदी (विशंबर सिंग, भीमा’), गीतांजली मिश्रा (राजेश, हप्‍पू की उलटन पलटन’) आणि विदिशा श्रीवास्‍तव (अनिता भाबी, भाबीजी घर पर है’). मालिका भीमा’मधील विक्रम द्विवेदी ऊर्फ विशंबर सिंग म्‍हणाले, “या वर्षातील माझा फिटनेस संकल्‍प माझी सध्‍याची शरीरयष्‍टी आजीवन राखण्‍याचा आहे. हे ध्‍येय साध्‍य करण्‍यासाी मी साखरेचे सेवन पूर्णपणे बंद केले आहे कर्बोदके, प्रथिने व फायबरने युक्‍त आहाराच्‍या सेवनावर लक्ष केंद्रित केले आहे. मी जिममध्‍ये न जाता पूरक व्‍यायाम करतो, जे मी दररोज व्‍यस्‍त शेड्यूल असताना देखील करतो. २०१९ मध्‍ये मी फिटनेसकडे लक्ष देण्‍यास सुरूवात केली, तेव्‍हा माझे वजन जवळपास ५८ किलो होते. आज माझे वजन ७० किलो आहे आणि माझ्या उंचीला अनुसरून आहे. तेव्‍हापासून, माझ्या शरीरयष्‍टीमध्‍ये मोठे बदल झाले आहेत. शरीरातील प्रत्‍येक अवयवामध्‍ये बदल व ताकद दिसून आली आहे. या परिवर्तनामुळे माझी शरीरयष्‍टी सदृढ होण्‍यासोबत माझे एकूण आरोग्‍य व स्‍वास्‍थ्‍य उत्तम झाले आहे, ज्‍यामुळे मला सातत्‍यता राखण्‍यास प्रेरणा मिळत आहे.”

मालिका हप्‍पू की उलटन पलटन’मधील गीतांजली मिश्रा ऊर्फ राजेश म्‍हणाल्‍या, “यंदा माझा फिटनेस संकल्‍प ह्दयाचे आरोग्‍य उत्तम ठेवण्‍याचा आहे. मी हायड्रेटेड राहण्‍याला प्राधान्‍य देते, ज्‍यासाठी दिवसभर भरपूर पाणी पिते आणि ताज्‍या फळांचा किंवा वेजीटेबल ज्‍यूस असलेली बोटल सोबत ठेवते. तसेच, मी नियमितपणे चिंतन करते, कामादरम्‍यान ब्रेक घेऊन आराम करते. कधीकधी मनसोक्‍त फूडचा आस्‍वाद घेते, पण जंक फूड टाळते, त्‍याऐवजी हिरव्‍या पालेभाज्‍या, ताज्‍या भाज्‍या, फळे व दूध असलेल्‍या संपन्‍न आहाराचे सेवन करते. मी सर्वांना एकूण आरोग्‍य उत्तम ठेवण्‍यासाठी आणि आरोग्‍यदायी जीवनशेलीसाठी योग्‍य हायड्रेशनची खात्री घेण्‍यासाठी आरोग्‍यदायी खाण्‍याच्‍या सवयींना प्राधान्‍य देण्‍याचे आवाहन करते.” मालिका भाबीजी घर पर है’मधील विदिशा श्रीवास्‍तव ऊर्फ अनिता भाबी म्‍हणाल्‍या, “माझ्यासाठी फिटनेस म्‍हणजे फक्‍त चांगले दिसणे नाही तर दररोज छान व उत्‍साही वाटणे महत्त्वाचे आहे. यंदा, मी सर्वांगीण दृष्टिकोन आखला आहे, नियमितपणे कार्डियो करत शरीर व हृदय आरोग्‍यदायी ठेवण्‍याचा प्रयत्‍न करते, माझ्या शरीराची काळजी घेत हार्मोनल संतुलन राखते आणि एकूण स्‍वास्‍थ्‍य उत्तम ठेवते. मी फिटनेसला धमाल अनुभव देखील करते. नवीन डान्‍स वर्कआऊट्स, हायकिंग किंवा शांतपूर्ण योग करायचा असो मी त्‍यामधून आनंद घेण्‍याचा प्रयत्‍न करते. सर्वात महत्त्वाचे म्‍हणजे मी स्‍वत:ला आठवण करून देत राहते की परिपूर्णतेपेक्षा प्रगती महत्त्वाची आहे. लहान, सातत्‍यपूर्ण प्रयत्‍नांमधून दीर्घकालीन फळ मिळते आणि आरोग्‍यदायी, आनंदी जीवनासाठी माझा हा मंत्र आहे.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…