
no images were found
टोयोटा किर्लोस्कर मोटरने लँड क्रूझर ३०० साठी बुकिंग सुरू
बंगळुरू, -टोयोटा किर्लोस्कर मोटरने आज त्यांच्या प्रतिष्ठेचे प्रतीक, सामर्थ्य आणि मजबूत क्षमतेचा वारसा असलेल्या लँड क्रूझर ३०० साठी अधिकृत बुकिंग सुरू करण्याची घोषणा केली. ७० वर्षांहून अधिक काळाच्या त्यांच्या प्रतिष्ठेला डोळ्यासमोर ठेवत बनविण्यात आलेल्या या एसयूव्हीमध्ये टोयोटाच्या अभियांत्रिकी कौशल्याचा सर्वोच्च संगम आहे. ही कार आरामदायी व्यवस्था आणि सर्वच प्रकारच्या रस्त्यांवर वाहन चालविण्याचा आनंद घेण्याची ईच्छा असणाऱ्या वाहनप्रेमींची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे.
अतुलनीय विश्वासार्हता, दिसण्यात दमदार आणि उत्कृष्ट कामगिरी यांसाठी प्रसिद्ध असलेली लँड क्रूझर ३०० ही टोयोटाच्या जागतिक एसयूव्ही श्रेणीमधील फ्लॅगशिप आहे. या नवीन मॉडेलमध्ये परिवर्तनकारी प्लॅटफॉर्म, प्रगत पॉवरट्रेन, अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये आणि आलिशान इंटेरियर यांचा समावेश आहे, जे लक्झरी, ताकद आणि सर्वच प्रकारच्या रस्त्यांवर वाहन चालविण्याचा आनंद द्विगुणित करतात.
सर्वोत्कृष्ट सामर्थ्य आणि उत्कृष्ट ऑफ-रोड क्षमततेसह नवीन कामगिरीचा युगारंभ
लँड क्रूझर ३०० झेड एक्स आणि जीआर-एस या दोन विशेष श्रेणीमध्ये उपलब्ध असून ट्विन-टर्बोचार्ज्ड व्ही६ इंजिनने सुसज्ज आहे. यामध्ये पूर्वीच्या मॉडेलच्या तुलनेत सुधारित कार्यक्षमता, जास्त टॉर्क निमिर्ती आणि अधिक चांगली इंधन कार्यक्षमता आहे. १०-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह, ही एसयूव्ही स्मूथ अॅक्सेलरेशन आणि अचूक पॉवर डिलिव्हरी देऊन प्रत्येक प्रवास अधिक रोमांचक बनवते.
टोयोटाच्या टीएनजीए-एफ प्रणालीवर आधारित, मजबूत लॅडर-फ्रेम डिझाइनसह, लँड क्रूझर ३०० अधिक हलकी आणि मजबूत असून सुसाट चपळता प्रदान करते. टोयोटाच्या एडब्ल्यूडी इंटिग्रेटेड मॅनेजमेंट (एआयएम) प्रणाली रिअल-टाइममध्ये रस्त्याच्या बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेत स्थिरता आणि नियंत्रण सुधारते. ऑफ-रोड प्रेमींसाठी, मल्टी-टेरेन सिलेक्ट (एमटीएस) आणि मल्टी-टेरेन मॉनिटर सुसज्ज असून, वाळू, चिखल, बर्फ किंवा खडकाळ प्रदेशांवर गाडी चालवताना हे अचूक नियंत्रण आणि मार्गदर्शन देते. याशिवाय, जीआर-एस व्हेरियंटमध्ये ऑफ-रोड ट्यून केलेले सस्पेन्शन, डिफरेंशियल लॉक आणि सुधारित शॉक अॅब्जॉर्बर्स देण्यात आले आहेत, जे अत्यंत कठीण परिस्थितीत सहज हाताळणीस मदत करतात.
टोयोटा किर्लोस्कर मोटरचे विक्री, सेवा आणि वापरलेले वाहन व्यवसाय विभागाचे उपाध्यक्ष श्री. वरिंदर वाधवा यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, “लँड क्रूझर 300 ही सामर्थ्य, व्यवस्थापन आणि उत्कृष्ट ऑफ-रोड क्षमता यांचे अंतिम प्रतीक आहे. टोयोटाच्या टीएनजीए-एफ प्रणालीवर तयार केलेले हे मॉडेल शक्तिशाली ट्विन-टर्बो व्ही६ इंजिन, अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये आणि मजबूत तरीही आलिशान डिझाइन प्रदान करते. अति कठीण प्रदेश असो किंवा शहरातील रस्ते पार करायचे असोत, ही एसयूव्ही आराम, उत्कृष्ट कामगिरी आणि उत्कंठा वाढविणारा प्रवास याचा अतुलनीय मिलाफ देते. उत्कृष्टतेची मागणी करणाऱ्यांसाठी ही एसयूव्ही परिपूर्ण साथीदार आहे.”
लँड क्रूझर 300 च्या उल्लेखनीय प्रवासाने आमच्या प्रतिष्ठित ग्राहकांमध्ये एक अनोखे स्थान मिळविले आहे. आम्हाला विश्वास आहे की लँड क्रूझर ३०० ग्राहकांच्या अपेक्षांपेक्षा अधिक सक्षम ठरेल, कारण ही एसयूव्ही तिच्या पूर्वइतिहासाचा, नाविन्याचा सर्वोत्तम मिलाफ साधत आहे. यामुळेच ते प्रिमियम एसयूव्ही श्रेणीमधील हिरो ठरणार आहे.