
no images were found
“काली मा चे रूप घेताना मला निडरता, आंतरिक शक्ती आणि संकटांवर मात करण्याची क्षमता हे मातेचे गुण अंगिकारण्यास देखील मदत होते – बरखा बिष्ट
सोनी सबवरील तेनाली रामा मालिकेतील तेनाली (कृष्ण भारद्वाज)च्या वेधक गोष्टींनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होत आहे. तेनाली हा दरबारी कवी होता, जो आपल्या बुद्धीचातुर्याबद्दल ओळखला जात असे. तेनालीला विजयनगर साम्राज्यातील त्याचे स्थान पुन्हा प्राप्त करून देण्यात साक्षात काली मातेची (बरखा बिष्ट) दिव्य शक्ती त्याच्या पाठीशी होती. दिव्य स्वरूपी काली माता तेनालीला शहाणीव आणि संकटांवर मात करण्याची शक्ती देते. बरखासाठी देवीचे रूप साकारणे ही केवळ एक अभिनयाची संधी नसून काली मातेचे संरक्षणात्मक गुण अंगिकारण्याची संधी आहे.
काली मातेची भूमिका करण्याबद्दल आणि तो खास पोशाख धारण करण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात, याबाबद्दल बरखा म्हणते, “मातेचा लुक धारण केला की तिच्यातील निडरता, आंतरिक शक्ती आणि संकटांवर मात करण्याची तिची ताकद हे गुण अंगिकारण्यास देखील मला मदत होते. देवीचे हे दिव्य रूप पडद्यावर साकार करण्यात पोशाख, आभूषणे आणि नाट्यमय मेकअप यांचा मोठा वाटा आहे. तयार होण्याची प्रक्रिया खूप किचकट आणि प्रदीर्घ आहे. या मेकअपसाठी आणि बोजड मुकुट आणि आभूषणे परिधान करण्यासाठी तासन् तास जातात. काली मातेचे व्यक्तिमत्व अस्सल बनवण्यासाठी या सगळ्याचा उपयोग केला जातो.”
प्रखर प्रकाशात तासन् तास काम करताना त्वचेची काळजी घेणे महत्त्वाचे होऊन जाते. बरखा स्किनकेअर रूटीनचे काटेकोर पालन करते. ती म्हणते, “स्किनकेअर प्रक्रियेतला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे मेकअप व्यवस्थित उतरवणे. जर मेकअप नीट निघाला नाही, तर तो त्वचेला नुकसान करतो. विशेषतः आम्ही मेकअप करून दिवसभर उन्हात काम करत असल्याने तो पूर्णपणे काढणे गरजेचे आहे. मेकअप काढल्यानंतर व्यवस्थित क्लीन्सिंग आणि मॉईश्चराईझिंगची गरज असते. त्वचा नेहमीच हायड्रेटेड ठेवणे अत्यावश्यक आहे, आणि मेकअप काढताना या दोन्ही गोष्टींचे मी काटेकोर पालन करते.”